jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
अतिक्रमण धारकांच्या दुकानावर चालविला बुलडोझर
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- दिनांक २८/०२/२०२५ शुक्रवारला चिमूर तालुक्यातील भिसी येथील अतिक्रमण धारकांच्या दुकानावर भिसी नगरपंचायतीने बुलडोझर चालविला असून भिसी येथील अनधिकृत अतिक्रम भुईसपाट झाले.
रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने अतिक्रमण धारकांना नोटीस बजावण्यात आली होती. काही अतिक्रमण धारकांनी स्वतःहुन रस्ता मोकळा करून दिला. तर काही बांधकाम पक्के असल्याने बुलडोझर फिरवून काढण्यात आले.
यावेळी कोणत्याही प्रकारची अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले. लहान दुकानदारांचे अतिक्रमण काढण्यात आले मात्र मोठ्या दुकानदारांचे अतिक्रमण थातुरमातुर काढले अशी अतिक्रमण धारकांमधे दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.