jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
चिमूर तालुक्यातील नेरी येथील घटना
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर तालुक्यातील अवघ्या १० की.मी.अंतरावर नेरी गाव आहे शेतीच्या वादातुन घडली घटना. आज दिनांक २७/०२/२०२५ रोजी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. सविस्तर वृत्त असे की आरोपी नामे वसंता महादेव पिसे रा. नेरी, तालुका चिमूर जि. चंद्रपुर यांच्याविरुध्द भारतीय दंड विधान कलम ३२६ अन्वये चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा नोंद झालेला होता व सखोल तपासानंतर पोलीस अधिकारी चिमूर यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय, चिमूर येथे आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले.
सदर प्रकरणात न्यायालयात सरकार पक्षातर्फे फिर्यादी, जखमी व इतर साक्षदाराचे साक्षपुरावे घेण्यात आले. फिर्यादी, जखमी व इतर साक्षपुराव्याच्या आधारे श्रीमती आर. व्ही. डफरे, न्यायदंडाधिकारी साहेब प्रथमश्रेणी, चिमूर यांनी आज दिनांक २७/०२/२०२५ रोजी आरोपी नामे वसंता महोदय पिसे रा. नेरी यांना सदर प्रकरणात कलम ३२४ अन्वये दोषी ठरवुन आरोपीला १ वर्षाची सश्रम कारावास व १०००/- रु. दंड इतकी शिक्षा ठोठावण्यात आली.
सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे के. व्ही. तोकलवार, सहाय्यक सरकारी अभियोक्ता, चिमूर यांनी बाजू मांडली व पोलीस निरीक्षक संतोष बाकल, पोलीस स्टेशन चिमूर यांच्या मार्गदर्शना खाली कोर्ट पैरवी म्हणून अवधुत खोब्रागडे, पोलीस शिपाई, पोलीस स्टेशन चिमूर यांनी काम पाहीले.