jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- मार्च महिना सुरू झाला असुन उष्णतेला सुद्धा सुरूवात झाली आहे.या वर्षी मार्च महिन्यात उष्णतेने उसळी घेतली आहे.या उष्णतेची झळ मानवासोबत मुक्या प्राण्यांना सुद्धा बसत आहे.उष्णतेमुळे पक्ष्यांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे.पाणी मिळत नसल्याने पक्ष्यांचा मृत्यू होत आहे.यामुळे पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी कमी होत आहे.
पक्ष्यांची संख्या वाढावी व पक्ष्यांना पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी चिमूर तालुक्यातील पर्यावरण प्रेमी व पक्षी प्रेमी कवडू लोहकरे यांनी आपल्या परिवारासह झाडांना पक्षी घागर लावण्यात आली.दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा पक्षी घागर उपक्रम हाती घेतला.
“अवैध वृक्षतोड, जंगलातील वनवा , शहरीकरण , रासायनिक खतांचा अवाजवी वापर, जल , वायु प्रदुषण, मोबाईल टाॅवर, अपघात, पक्ष्यांची शिकार, तापमानात वाढ यामुळे पक्ष्यांचा अधिवास नष्ट होत आहेत. सारस, माळढोक व गिधाड नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पक्ष्यांची संख्या वाढण्यासाठी व पक्ष्यांचा पाण्याअभावी मृत्यू होऊ नये यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरी व झाडावर पक्षी घागर लावावी”