jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर, दि. 10 मार्च : भारतीय हवामान खात्याकडून चंद्रपूर जिल्ह्यात एक दोन ठिकाणी 12 व 13 मार्च या दोन दिवसाकरिता उष्मा लाटेबद्दल सतर्कता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी याबाबत खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले आहे.
उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी उष्ण लाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने घ्यावयाची दक्षता :
काय करावे : पुरेसे पाणी प्या, शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखा. घराबाहेर पडतांना डोके झाकण्यासाठी टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा. दुपारी 12 ते 4 वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. थेट येणाऱ्या सुर्यप्रकाशाला/उन्हाला अडविण्याकरिता घरातील पडद्यांचा वापर करावा. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टिव्ही, किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
काय करू नये : उन्हात अतिकष्टाची कामे करु नये. दारु, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नये. दुपारी 12 ते 4 च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नये. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे, तसेच मोकळया हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी. चप्पल न घालता अनवाणी उन्हात चालू नये.