jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
अविनाश देशमुख शेवगाव 9960051755
शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या काही दी वसांपासून जेष्ठ नागरिक दिव्यांग विधवा परित्यक्ता अशा अनेक योजनेतील लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतून मिळणाऱ्या लाभासाठी आता शासनाने डी. बी. टी. [ डायरेक्ट बेनिफिशियरी अकॉउंट ट्रान्स्फर ] मुळे अनेक लाभार्थ्यांना फटका बसला आहे अचानक गेल्या सहा महिन्यांपासून पैसे येणे बंद झाले त्यात तहसील कार्यलयात संजय गांधी टेबल वरील कर्मचारी आणि अधिकारी उद्धट वागणूक देत असल्याने के.वाय.सी. करण्यासाठी तहसील कार्यालयात जणू लाभार्थ्यांची जत्राच भरलेली दिसत आहे, वास्तविक पाहता के.वाय.सी. करण्यासाठी लाभार्थ्यांच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे अपेक्षित आहे, परंतु याची पूर्व कल्पना किंवा याची पूर्ण माहिती प्रशासनाने प्रत्येक गावात दवंडी देऊन नागरिकांमध्ये जागृती करणे अपेक्षेचे होते.
परंतु प्रत्यक्षात तसे न झाल्यामुळे अडाणी वृद्ध व नडलेल्या नागरिकांची मात्र प्रशासनाच्या ढिल्ल्या नियोजनामुळे चांगलीच पंचायत झाल्याचे पहायला मिळत आहे. के.वाय.सी. करतांना मोबाईल नंबर लिंक नसल्याने पुन्हा मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी जेष्ठ नागरिकांची दमछाक होत आहे त्यातील अनेक गोरगरिबांकडे तर मोबाईलच नाही त्याच्यावर इतरांच्या पाया पडायची वेळ आली आहे अधिकारी व कर्मचारी देखील व्यवस्थित मार्गदर्शन करत नाहीत. त्यांची अवस्था “भीक नको पण कुत्रा आवर” अशी झाली आहे कार्यालयात कर्मचाऱ्यांची तुटपुंजी कुमक आणि प्रचंड गर्दी यातून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे, तालुक्याचे मुख्यालय असलेल्या शेवगाव तहसील मध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही…! स्वच्छतागृह तर प्रदर्शनात मांडण्याइतके स्वच्छ असतात अनेक तर कुलुप बंदच आहेत. त्यात उन्हाचा तडाखा वरून जेष्ठ नागरिक आणि महिला काय करणार ??? पिण्याच्या पाण्याचं सोडा… एवढी गर्दी आणि या गर्दीने केलेल्या लघुशंका याचं प्रमाण वाढल्यामुळे तहसील मध्ये दुर्गंधी पसरलेली पहावयास मिळते आहे.
तहसील चे कर्मचारी आणि कामासाठी आलेल्या नागरिकांच्या आरोग्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. भर उन्हात गर्दीत नंबरला थांबलेल्या वृद्धांना शुगर, बी.पी., प्याऱ्यालिसिस सारखे गंभीर आजार असल्याने आणि दिवसभर आपला नंबर जाऊ नये म्हणून उपाशी पोटी थांबल्याने अनेक लोकांना चक्कर भोवळ येण्याच्या घटना देखील घडत आहेत, तहसील प्रशासन मात्र फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचे पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गळ्यात ओळखपत्र ननसल्याने किंवा त्यांच्या टेबलवर नेमप्लेट नसल्याने नेमक चपराशी कोण ? कर्मचारी कोण ? अधिकारी कोण ?काही कळत नाही काही नमुने आपल्या टेबलवर कार्यालयीन वेळेत पूर्ण वेळ थांबत नाहीत [ काही कर्मचारी तर टुन्न होऊनच येतात ] त्यांची तक्रार वरिष्ठांकडे केल्यास ते हात वर करतात यातून नागरिकाने सरकारी कर्मचारी शोधायचा कसा ? हा प्रश्न देखील सर्व सामान्यांना पडतो आणि मग हे तहसील कार्यालय आहे की सरकारी धर्मशाळा असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*