jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे
यवतमाळ :- डॉ.विकास मीना IAS हे 2018 च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहे. येथे रुजु होण्यापुर्वी ते छत्रपती संभाजी नगर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यापुर्वी नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय येथे प्रकल्प अधिकारी सोबतच उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. डॉ.मीना यांच्या भारतीय प्रशासकीय सेवेची सुरुवात अमरावती जिल्ह्यातून झाली. अमरावती येथे परिविक्षाधिन कालावधीत त्यांनी विविध पदांवर काम केले.
त्यांनी प्रथम UPSC परीक्षा उत्तीर्ण करून ते प्रथम IPS झाले. परंतु त्यांना IAS कलेक्टर व्हायचं होत. त्यांनी पुन्हा UPSC ची परीक्षा दिली आणि ते IAS झाले.आज यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले.त्या प्रसंगी राहुलभाऊ मेश्राम , राजूभाऊ चांदेकर ,चंद्रशेखर मडावी, किशोरभाऊ उईके, लक्ष्मणराव कुळसंगे, प्रल्हादराव सीडाम, पवनकुमार आत्राम, मेश्राम साहेब. गुलाबराव घोडाम , दिलीपराव मसराम, गुलाबराव मसराम , सुरेश मडावी इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.