jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
” चिमूर नगर परिषदेचा भोंगळ कारभार “
” महिलांनी मुख्याधिकारी यांना दिले निवेदन “
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर तालुक्यातील बाम्हणी हे गाव आधी ग्राम पंचायत होते. मात्र नगर परिषद चिमूर झाली असता यामध्ये या गावाचा समावेश करण्यात आला. प्रगतीच्या नावाखाली मात्र आश्वासनच दिले गेले असून बाम्हणी येथे अनेक समस्याचे डोंगर साचले आहे. या गावाकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे.
बाम्हणी या प्रभागात मागील २० दिवसापासून पाणिपुरवठा पूर्णतः बंद असून वारंवार तक्रारी देऊन देखील तक्रारीकडे जाणीवपूर्वक नगर परिषद दुर्लक्ष करीत असल्याचे गावातील सर्व महिला यांनी आपबीती सांगितली. पिण्याच्या पाण्याकरीता व वापराकरीता पाणी जनतेला उपलब्ध नसून पाण्याकरीता भटकंती करावी लागत असून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर जाऊन पिण्याचे पाणी आणावे लागत आहे.
याकरिता सर्व बाम्हणी वासीय महिलांनी नगर परिषद चिमूर गाठून मुख्याधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी सौ.श्वेता प्रशांत गजभिये,सौ.सिमा किसन गराडकर, सौ.सुषमा प्रमोद गजभिये, सौ.दमयना वासुदेव भिमटे, सौ.शैला कृष्णा मेश्राम, सौ.शारदा प्राणहंस गजभिये, सौ.पंचशिला रतिराम ख्रोबागडे, सौ.निंबुना जयराम बांबोडे, सौ.अश्वीनी प्रविण गौरकार, सौ.मंजुषा पुंडलिक गजभिये आदी गावकरी महीला उपस्थित होत्या.