jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात येत असलेले प्रसिद्ध घोडाझरी तलावात पाच युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू
प्राप्त माहितीनुसार चिमूर तालुक्यातील साटगाव-कोलारी येथील अनिकेत यशवंत गावंडे, जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे, तेजस बालाजी गावंडे, तेजस संजय ठाकरे व आर्यन हेमराज हिंगोली असे एकूण सहा मुले घोडाझरी तलावावरील पर्यटनाचा आनंद घेत सर्व फिरून झाल्यानंतर त्यांचा पोहण्याचा मोह झाला दुपारच्या ४:०० वाजताच्या सुमारास तळोधी बाळापूर नळ पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी असलेल्या परिसरात सहा मुले पोहण्याकरिता तलावात उतरली. पाण्याची पातळी खोल आणि या परिसरात डोह असल्यामुळे पाच जण डोहामध्ये बुडाले. व आर्यन हेमराज हिंगोली हा १६ वर्षाचा मुलगा बचावला तर उर्वरित जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे, अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे, तेजस संजय ठाकरे हे पाचही मुले तलावात बुडाली. पाच मुलांपैकी चार गावंडे कुटुंबातीलच आहेत.
त्यामध्ये दोन सख्खे भाऊ आहेत. तर एका मित्राचा समावेश आहे. सर्व मुले १८ ते २२ वर्षे वयोगटातील आहेत. तलावातून वाचून बाहेर आलेल्या मुलाने सदर घटना घटनास्थळी असलेल्या नागरिकांना सांगितली. त्यानंतर तत्काळ नागभीड पोलिसांना माहिती देण्यात आली. अवघ्या काही वेळातच नागभीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पाचही मुले तलावातच बुडालेले आहेत. सदर घटनेची माहिती मुलांच्या कुटुंबीयांना साटगाव कोलारी येथे देण्यात आलेली आहे. पोलिसांनी घटनास्थळी प्राथमिक चौकशी सुरू केली असून शोधमोहीम सुरू झाली अशी माहिती पुढे आली आहे.