jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
” राष्ट्रपती, प्रधानमंत्री व बिहारचे राज्यपाल, मुख्यमंत्री यांना निवेदन “
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- भिक्खू संघ संगरामगीरी, समता सैनिक दल, बौद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समन्वय समिती तालुका चिमूर च्या वतीने गुरुवार ला दुपारी 1 वाजता संविधान चौक वडाळा (पैकु) चिमूर येथील सम्राट अशोक स्तंभाला मानवंदना देवून बौद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी तालुक्यातील आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला.
शहरातील वडाळा (पैकु) चिमूर येथील संविधान चौकातून संघरामगीरी येथील भंते डॉ धम्मचेती यांच्या नेतृत्वात रॅलीला सुरुवात करण्यात आली. ही रॅली शहरातील मुख्यमार्गाने लूंबीनी नगर, छत्रपती संभाजी महाराज चौक ( हजारे पेट्रोल पंप ), हुतात्मा स्मारक मार्गे इंदिरा नगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला माल्यार्पण करून तहसिल कार्यालयावर रॅली पोहचली. रॅलीचे सभेत रूपांतर झाले. दरम्यान भंते डॉ धम्मचेती, ॲड भूपेश पाटील, एन. आर. कांबळे, विरेंद्र बनसोड यांची भाषणे झाली. सभेत कार्यक्रमाचे संचालन प्रकाश मेश्राम, प्रास्ताविक विलास राऊत, व आभार शुभम मंडपे यांनी मानले.
दरम्यान बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धाचे ऐतीहासीक स्थळ आहे. जगभरातील बौद्ध बांधव व देशातील बौद्ध बांधवांच्या भावणा या स्थळाशी जुळल्या आहेत.मात्र या ऐतीहासीक महाविहाराचे विद्रुपीकरन केल्या जात आहे. बौद्ध गया मंदीर कायदा 1949 रद्द करून महाबोधी मंदिराचे व्यवस्थापन आणि नियंत्रण बौद्ध प्रतिनिधीच्या संयुक्त मंडळाकडे सोपवावे, महाबोधी मंदिराचा कारभार हिंदू बहुसंख्य समितीला देने हा स्पष्ट भेदभाव आहे. बौद्धधर्म हा स्वतंत्र धर्म आहे परंतु बौद्धगया मंदीर कायदा 19 49 बौद्धांना त्यांच्या स्वताच्या धार्मिक स्थळांपासून वंचित ठेवतो.
जर इतर धर्माचे धार्मिक स्थळ व संपूर्ण व्यवस्थापन त्या समाजाकडे असेल तर बौद्धांना हा अधिकार का नाही, बौद्धांना त्यांच्या स्वतःच्या पवित्र स्थळाच्या व्यवस्थापनापासून वंचित ठेवणे हे त्यांच्या धार्मिक स्वांतत्र्याचे उल्लंघन आहे.त्यामुळे बौद्ध मंदीरांची सांस्कृतीक व धार्मिक ओळख कमकूवत होत आहे. त्यामुळे जागतिक वारसा असलेल्या बौद्धगया महाबोधी विहाराच्या रक्षणाच्या दृष्टीने हा प्रश्न गाभीर्याने घ्यावा आदी मागण्याचे निवेदन तहसीलदार मार्फत राष्ट्रपती, प्रधानमंत्री, बिहारचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवीन्यात आले.तालुक्यातील हजारो आंबेडकरी बौद्ध समाज रॅलीत सहभागी झाला होता रॅली यशस्वी करण्यासाठी बौद्धगया महाबोधी विहार मुक्ती आंदोलन समन्वय समितीचे महेंद्र बारसागडे, प्रशांतकुमार देठे, जगदीश मेश्राम,प्रियानंद गेडाम, मनोज राऊत, आकाश भगत, पुंडलीक पाटील आदी समाज बांधवानी सहकार्य केले.