अविनाश देशमुख
शेवगाव :- शेवगाव दि 22 मार्च 2025 वार शनिवार या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील एस.टी. स्टँड समोर शिवम सायकल मार्ट हे संजय उर्फ कृष्णा गुलाटी यांच सायकल चे दुकान आहे त्याची अतिक्रमणा मध्ये येत असलेली भिंत पाडण्यासाठी वडुले बु. येथील एका खासगी जे.सी.बी. च्या सहाय्याने पाडत असताना बुधवारी रात्री ९:३० ते १० वा. च्या दरम्यान जे.सी.बी. चालकाकडून बेजबाबदारपणे भिंतीचा समोरच भाग जास्त प्रमाणात पाडला गेला. त्यावेळी नेवासा येथील रहिवासी असलेले साहेबराव धनवटे यांना जबर दुखापत झाल्याने साहेबराव महादेव धनवटे वय ४५ रा संभाजीनगर ता. नेवासा जि. अहिल्यानगर या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला याबाबत सविस्तर माहिती अशी की शेवगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समाधान नागरे हे त्या ठिकाणाहून जात असताना त्यांना सदरची घटना दिसली.
त्यांनी तात्काळ शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार अरविंद चव्हाण ,पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ ,पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर यांना संबंधित घटनेची माहिती दिली. त्यानंतर वरील कर्मचाऱ्यांनी साहेबराव धनवटे यांना सरकारी दवाखान्यात पाठवले परंतु डॉक्टरांनी जास्त दुखापत झाल्यामुळे त्यांना मृत घोषित केले. [ म्हणजे भिंतीचा मोठा भाग अंगावर कोसळल्याने ते गंभीर जखमी होऊन मृत पावले ] त्यामुळे सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल हीनार का JCB चालक आणि दुकान मालक आरोपी होणार का ??? या बाबत शेवगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस हवालदार अरविंद चव्हाण ,आदिनाथ शिरसाट आबासाहेब गोरे हे करत आहेत.
*ताजा कलम*
दरम्यान शेवगाव नगर परिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतल्यानंतर शिवम सायकल मार्ट चे मालक संजय उर्फ कृष्णा गुलाटी हे आपल्या वादग्रस्त वागण्याने कायम चर्चेत आहेत. त्यांच्या शेजारचे आत्महत्या केलेले मयत नाभिक पांडुरंग उर्फ संजय शिंदे यांच्याशी सुद्धा त्यांच्या आत्महत्येपूर्वी जागेवरून चांगलीच बाचाबाची झाल्याची शेवगांव शहरात चर्चा आहे. शिवम सायकल मार्टचा सायकलींचा पसारा अतिक्रमण हटविण्यापूर्वी नेवासा रोडवर कायम रहदारीला अडथळा ठरत असे त्यामुळे कायम ट्राफिक जॅम होत असे हे महाशय कायम येणाऱ्या जाणार्याशी हुज्जत घालताना दिसत असत त्यात सुद्धा शेवगांव पोलिसांनी त्यांची कसुन चौकशी केली पाहिजे व अशी जोरदार चर्चा शहरात सुरु आहे.
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*