Breaking News

ऑक्सीमित्र अभियानांतर्गत कोरोना जनजागृती

आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते साधणार जनतेशी थेट संवाद.*

नागपुर :- ऑक्सीमीटर मुळे लोकांचा अनमोल जीव वाचू शकतो असा संदेश दिल्लीचे मा मुख्यमंत्री श्री अरविंदजी केजरीवाल यांनी आपल्या अनुभवातून दिला आहे. कोविड महामारीच्या सुरवातील दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर होती, परंतु दिल्ली सरकार कडून अनेक नवनवे प्रयोग करण्यात आलेत. त्यामध्ये प्लाज्मा थेरपी असेल किंवा ऑक्सीमीटर च्या माध्यमातून होम कोरणटाईन्स असेल ह्या यशस्वी प्रयोगामुळे दिल्लीतील महामारीवर नियंत्रण आणता आले. हे दिल्ली पुरते मर्यादित न राहता या माध्यामतून संपूर्ण देशातील जनतेमध्ये जनजागृती निर्माण होऊ शकते, यासाठी राष्ट्रव्यापी ऑक्सीमित्र अभियान दिल्लीचे मुख्यमंत्री मा. अरविंदजी केजरीवाल ह्यांच्या द्वारे सुरू केले गेलेले आहे. त्यांनी पार्टी कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन सर्व सामान्य जनतेची ऑक्सीजन लेव्हल तपासण्याचे महत्व पटवून दिले आहे.

याच राष्ट्रव्यापी अभियानाचा भाग म्हणून नागपूर मध्ये आम आदमी पार्टी चे ऑक्सीमित्र घरोघरी जाऊन कोरोना जागरूकता अभियान राबवित्यांना नागरिकांबरोबर थेट संपर्क आणि संवाद साधणार आहेत

संपूर्ण जग सद्या कठीण प्रसंगातून जात आहे. अश्यावेळी आपण सर्वांनी एक दुसऱ्याची मदत करायला हवी आणि तशी आपली जबाबदारी असायला पाहिजे. हीच भावना समोर ठेवून ऑक्सीमित्र अभियानअंतर्गत जर आपण एखाद्या व्यक्तीची ऑक्सीजन लेव्हल तपासली आणि ती कमी होत असेल तर त्यांना सतर्क करून वेळेवर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली तर त्याचा जीव वाचवू शकतो, हे उद्दिष्ट समोर ठेवून येत्या गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२० पासून नागपूर येथिल आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते कोव्हीड -१९ महामारी मध्ये ऑक्सीमित्र अभियानांतर्गत घरोघरी जावून संवाद करतील. संक्रमणाच्या काळात स्वतः सोशल आणि फिजिकल डिस्टनसिंग पाळून व तसे त्याचे महत्व सुद्धा इतरांना पटवून देऊन इतर सावधगिरी बाळगत, जसे – मास्क वापरणे, वेळोवेळी हात धुणे, समोरासमोर चर्चा न करणे, अतिशय महत्वाच्या कामाशिवाय बाहेर न पडणे इत्यादी माहिती सुद्धा देणार आहेत.

आज पासून नागपूर शहरातील सहाही विधानसभा क्षेत्रात ऑक्सीमित्र अभियानांतर्गत कार्य सुरू करणार आहे. वस्ती-मोहल्ला येथे घरोघरी जाऊन, पोलीस स्टेशन, सरकारी कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी ऑक्सीमित्र अभियान राबवून कोरोना विषाणूची लक्षणे, जनजागरण, जागरूकता निर्माण करून आरोग्य टिकविण्यासाठी ऑक्सीमीटर कसे मोलाचे कार्य करते हे समजावून आणि ऑक्सीजन लेव्हल मोजून मोलाचे कार्य करणार आहेत. असे करून आरोग्य सेवेत कार्यरत संस्था, दवाखाने, कोरोना योध्यें ह्यांना सुद्धा एक प्रकारची मदतच करणार आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

रामटेकमधून सात उमेदवारांचे अर्ज मागे, नागपुरातून एकही अर्ज मागे नाही

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागपुरातून 26 तर रामटेकमधून 28 उमेदवार नागपूर, दि. 30 – लोकसभा सार्वत्रिक …

रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांची यादी

नागपूर, दि. 29 – रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी दि. 28 मार्च रोजी झालेल्या छाननीअंती ३५ उमेदवार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved