Breaking News

नागपूरचा जवान काश्मीरमध्ये शहीद

शासकीय इतमामात शुक्रवारी नागपूर येथे अंत्यसंस्कार

नागपूर दि २४ : जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील चाडूरा भागातील बडीपुरा येथे 24 सप्टेंबर रोजी सकाळी झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात नागपूर येथील नरेश उमराव बडोले शहीद झाले आहेत. त्यांचे पार्थिव आज रात्री उशिरा नागपुरात पोहोचणार आहे. उद्या शुक्रवारला सकाळी आठच्या सुमारास शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या वृत्तानुसार 24 सप्टेंबरला सकाळी अतिरेक्यांच्या हल्ल्यांमध्ये नरेश उमराव बडोले हे शहीद झालेत. शहीद नरेश उमराव बडोले हे नागपूर येथील हिंगणा परिसरातील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या कॅम्प जवळील पांडुरंग नगर येथील रहिवासी आहेत.

श्रीनगर येथून त्यांचे पार्थिव दिल्ली व त्यानंतर नागपूर विमानतळावर रात्री उशिरा पोहोचणार आहे. उदया दिनांक २५ सप्टेंबर शुकवारी सकाळी ८ वाजता नंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील,अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी दिली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 25 जून ते २४ जुलै या कालावधीत

बीएलओ करणार 25 जून ते २४ जुलै या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदार यादीची तपासणी …

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गतचे सर्व प्रस्ताव 1 जुलै पर्यंत स्विकारले जाणार

नागपूर, दि.20 : जिल्हा वार्षिक योजना 2024-25 अंतर्गत मंजूर नियतव्ययाच्या मर्यादेत येत्या 1 जुलैपर्यंत सर्व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved