Breaking News

ई-पिक व्यतिरिक्त 9 कागदपत्र मतदानासाठी ग्राहय

नागपूर,दि. 18: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी विधान परिषदेची द्विवार्षिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीकरीता मतदान करतांना मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ईपिक(ओळखपत्र) शिवाय खालील 9 कागदपत्र पुरावा म्हणून ग्राहय धरण्यात येणार आहेत.

आधारकार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज संस्था किंवा खाजगी औद्योगिक घराणे यांनी वितरित केलेले ओळखपत्र, खासदार, आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र, संबंधित पदवीधर. शिक्षण मतदार संघातील शिक्षण संबंधित कार्यरत असलेल्या पदवीधर शिक्षक मतदारांना वितरित केलेले सेवा ओळखपत्र, विश्वविद्यालयाद्वारे वितरित पदवी, पदवीका मुळ प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरण्णाद्वारे वितरित केलेले अपंगात्वाचे मुळ प्रमाणपत्र अशा 9 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राहय धरण्यात येणार आहेत.

छायाचित्रासह मतदार ओळखपत्रान्वये मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित करण्यात येणार आहे. छायाचित्रासह मतदार ओळखपत्रावरील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे किंवा पटविणे शक्य नसल्यास मतदारास उपरोक्त पर्यायी कागदपत्रापैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे. मतदार ओळखपत्र व पर्यायी ओळखपत्र याबाबत काही संभ्रम असल्यास भारत निवडणूक आयोगाचे आदेश अंतिम राहतील. परिषदेची द्विवार्षिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीकरीता नियुक्त सर्व संबंधित अधिकारी व सर्व मतदान केंद्राध्यक्षांनी यांची नोंद घ्यावी, असे विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजीव कुमार यांनी कळविले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा समृद्धी महामार्गावर भिषण अपघात, २५ प्रवाशांचा मृत्यू

नागपूर / बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याला जाणारी बसचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ …

राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर स्वागत 

नागपूर दि.२३ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आगमन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved