Breaking News

अवैध रेती उत्खनन करणाऱ्या ट्रॅक्टरवर वनविभागाची धडक कार्यवाही

तिन ट्रॅक्टर वनविभागाने केले जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-वनविभाग परिसरात अवैध उत्खनन करीत असल्याची गुप्त माहिती मिळताच वनविभाग पथकाने रात्रोच्या वेळी गस्ती दरम्यान तिन ट्रॅक्टरवर कार्यवाही केली असून हे तिन्ही ट्रॅक्टर चिमूर येथील वनविभागाने जप्त केले आहे.

दिनांक 26 जानेवारीच्या मध्य रात्री 12:15 वाजताच्या दरम्यान वनविभाग पथक गस्त घालित असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार उपक्षेत्र चिमूर नियतक्षेत्र गदगाव कक्ष क्रमांक 372 येथे अवैध रेती उत्तखनन करुण वाहतुक करीत असताना ट्रॅक्टर क्रमांक एम एच 34, एल 5391 मालक मारोती मुरलीधर निखाडे झरी, एम एच 34, ए पी 2926 मालक मोकिन गब्बर पटेल चिमूर, एम एच 34 एल 3293 मालक प्रकाश तुकाराम फुलझले,

तिन ट्रॅक्टर सापडले असून तिन हि ट्रॅक्टर वर कार्यवाही करीत वनविभाग चिमूर येथे जमा करण्यात आले आहे, सदरची कार्यवाही क्षेत्र सहायक आर. आर. नरड, वनरक्षक आर. डब्लू. हजारे, वनरक्षक एम. मेश्राम, वनरक्षक सी. एस.चिंचोलकर
यांनी केली असून पुढील तपास सुरु आहे,

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मालवाहू गाड्यामुळे बाजार पेठेतील रहदारीस अडथळा-नगरपरिषदेचे दुर्लक्ष

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरातील टिळक वॉर्ड येथील जुनी व मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांच्या …

ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील वीज ग्राहकांना महावितरण चा झटका

महावितरण मुंबई च्या भरारी पथकाची धडक कारवाई अनेकांची वीजचोरी पकडली मुंबईच्या भरारी पथकाने पकडले अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved