Breaking News

संस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडतात – माजी सभापती नरेंद्र झंझाळ

टवेपार येथील संस्कार शिबीराचा समारोप

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान
मो.9665175674

(भंडारा)- पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामांच्या गावात अनेक विद्यार्थी जायचे. मात्र आता मोबाईलमुळे मामाचे गाव जवळ झाले आहे. कारण मोबाईल व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केव्हाही जवळच असतात. आणि अशा शिबीरामुळे मुलांचा शारिरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक विकास होत असतो. शिबिर म्हणजे खुले व्यासपीठ आहे. त्यामुळे मनातील विविध प्रश्न दूर करता येतात. शिबिराच्या माध्यमातून मोठ्यांचा मान सन्मान करणे, चांगल्या सवयी लावणे, वेळेचे नियोजन, नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारणे,
संस्काराचे महत्व समाजात पटवून देण्यासाठी अग्रेसर होणे अशाप्रकारे विविध गुणांचा विकास होतो. आणि त्यातूनच राष्ट्र निर्मितीची संकल्पना साकार करण्यासाठी संस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडतात असे प्रतिपादन भंडारा पंचायत समितीचे माजी सभापती नरेंद्र झंझाळ यांनी केले.ते भागिरथा भास्कर हायस्कूल टवेपार येथील बाल संस्कार शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भागिरथा भास्कर हायस्कूल टवेपार येथील मुख्याध्यापक वाय.सी. रामटेके होते. प्रमूख पाहूणे म्हणून भंडारा पंचायत समितीचे माजी सभापती नरेंद्र झंझाळ, योग शिक्षक यशवंत बिरे, खोकरला येथील ग्राम पंचायत सदस्य एस. एम. घोडे, शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त राहुल मेश्राम, संस्थेचे सहसचिव श्रीकांत शंभरकर, उपसरपंच प्रभूजी मते, पोलीस पाटील श्रीकांत मते, शिबिर प्रमुख विलास केजरकर, शिबिर सह प्रमुख यशवंत बिरे, सामाजिक कार्यकर्ते राजेश तिजारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

बाल संस्कार शिबिरात योग शिक्षक यशवंत बिरे यांनी योग- प्राणायाम व कचऱ्यातून कला, राज्य सहसचिव विष्णुदास लोणारे अंधश्रद्धा निर्मूलन, श्री एम.आर. साटोणे कचऱ्यातून कला, विक्रम फड्‌के विविध अभिनय, निती आयोग समितीचे माजी सदस्य अविल बोरकर यांनी पाणी बचत व जैव विविधता, प्रा. नरेश आंबिलकर बोधकथा, विलास केजरकर संस्कार गिते, संदिप मस्के पक्षी निरीक्षक इत्यादींनी वक्त्यांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.

उपस्थित मान्यवरांचे आंनदायी पध्दतीने व पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.आठ दिवशीय बाल संस्कार शिबिरात विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यावेळी उत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून नैतिक सेलोकर, जागृती कोसरे व माही पूडके यांना गौरविण्यात आले. तसेच सर्व शिबिरार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन गोपाल सेलोकर व प्रास्ताविक अरूण बांडेबुचे यांनी केले तर उपस्थितांचे आभार हर्षा झंझाळ यांनी मानले. शिबिराच्या यशस्वीतेकरिता प्रणय बन्सोड, एन. के. देशभ्रतार, एस. एम. कडव, ए. एम. शंभरकर, ए. झेड. शेंडे, एस. के. महाजन, जी. एन. नान्हे, अवंतिका मने, रिधिमा लुटे, सलोनी कडव, किर्ती लुटे, अर्थव कातोरे, पूनम लुटे, नैतिक मते, अक्षरा कडव, दिव्या कातोरे, कुणाल सोनवाने, आयुष पुडके, वेदांत लुटे, क्रिश ब्रोंद्रे, अक्षरा मते, मयंक सेलोकर, वैष्णवी ठवकर, श्रावणी कोसरे, अक्षरा मते, खुशी गजभिये, तन्नु लुटे, परिधी मते , इत्यादी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी – विद्यार्थ्यींनींनी मोलाचे सहकार्य केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

लेखिका डॉ. मेधा कांबळे लिखित “आठवणीतील शेवगाव” या पुस्तकाने खोवला मानाचा तुरा

*”आठवणीतील शेवगाव” या डॉ. मेधा कांबळे लिखित पुस्तकाचे 18 मे शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता …

गेल्या सहावर्षापासून गोगलगायीच्या गतीने काम सुरू

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की डिसेंबर 2018 मध्ये तत्कालीन परिवहन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved