Breaking News

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

अवैधरित्या रेती वाहतूक करतांना तिन ट्रॅक्टर जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर : – दिनांक. २८/०४/२०२४ ला सकाळी ०६:३० ते ०८:०० वाजताच्या दरम्यान चिमूर वरोरा राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वर असलेल्या वहानगाव ते बोथली या गावाच्या मधोमध अवैधरित्या रेती वाहतूक करतांना ३ ट्रॅक्टर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर च्या पथकाने पकडून शेगाव पोलीस स्टेशनच्या आवारात जप्त करून कारवाई केली.

यावेळी पोलीस उप निरीक्षक विनोद भुरले,पोहवा स्वमिदास चालेकार,चंदू नागरे,अजय बगेसर, प्रशांत नागोसे स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी हि मोहीम यशस्वीरित्या पार पाडली.या प्रकरणातील आरोपी ट्रॅक्टर चालक (१) सौरभ दत्तू दडमल राहणार खडसंगी , (२) मनोज रमेश वानखेडे राहणार शेडेगाव , (३) बंडू बापूराव चौधरी राहणार खडसंगी , असून या ट्रॅक्टर चे आरोपी मालक (१) अनिल ज्ञानेश्वर मेश्राम राहणार खडसंगी , (२) सचिन ज्ञानेश्वर मेश्राम राहणार खडसंगी येथील असून दोघेही सख्खे भाऊ आहे. या अगोदर ट्रॅक्टर ने FDCM खडसंगी च्या जंगल परिसरात अवैधरित्या रेती वाहतूक करतांना खडसंगी लगत असलेल्या पुनर्वसन नवेगाव येथील मजुराचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेबाबत चिमूर पोलीस स्टेशनला गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता.असे असतांना देखील या माफियांना महसूल व पोलीस विभागाची भीती न बाळगता सर्रासपणे हा व्यवसाय सुरु आहे.

जिल्ह्यामध्ये कुठेही रेतीघाट लिलाव झालेली नसल्याने या रेती विक्री च्या व्यवसायात जिल्ह्यात तथा बाहेर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जास्त दरात रेतीची मागणी आहे. हा व्यवसाय चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात असंख्य माफियांनी या व्यवसायाला चालना देत व्यवसाय सुरू केला आहे.यांच्या ट्रॅक्टरच्या फाटक्या सायलेन्सर च्या कर्कश अशा आवाजाने महामार्गालगत राहणाऱ्या लोकांची रात्रीची झोप उडाली असून याबाबत अनेक निवेदने तसेच तक्रारी सुद्धा मोठ्या प्रमाणावर देण्यात आली आहे. या व्यवसायाने माफियांची दादागिरी वाढतच चालली असून चिमूर येथील प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालयाचे कर्मचारी माजी सैनिक तथा वनरक्षक यांना कर्तव्यावर असतांना रेती माफियांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली, हि सुद्धा घटना अगदी ताजीच आहे,आणि आरोपी हा सर्रासपणे सुसाट मोकाट फिरत असल्याने वनरक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.परंतु याकडे वन व महसूल विभागाने पाठ फिरविली असे चित्र या कारवाईनंतर दिसून येत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अखेर वनविभागाच्या जाळ्यात सापडला भानुसखिंडीचा बछडा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील भानुसखिंडी वाघिणीचा बछडा शिवा अखेर वनविभागाच्या जाळ्यात अडकला …

शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा 24 ते 26 मे दरम्यान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे घेण्यात येणारी शासकीय सहकार व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved