Breaking News

ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील वीज ग्राहकांना महावितरण चा झटका

महावितरण मुंबई च्या भरारी पथकाची धडक कारवाई अनेकांची वीजचोरी पकडली

मुंबईच्या भरारी पथकाने पकडले अनेक फॉल्टी मीटर्स हजारो रुपयेदंड आकारून कायदेशीर कारवाई करण्याची कारवाई सुरू अनेक सरकारी कर्मचारी सुद्धा वीज चोरी मध्ये सामील ???

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव:- याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या तीन-चार दिवसापासून महावितरण कार्यालयाची मुंबई येथील फ्लाईंग स्कॉड चे सोळा पथक शेवगा शहर आणि तालुक्यात वीज चोरी आकडे आणि मल्टीमीटर चा शोध घेण्यासाठी आलेले आहेत शेवगा शहर आणि तालुक्यामध्ये एकूण होत असलेला विजेचा वापर आणि गोळा होत असलेला वसूल महसूल { वीजबिल } यामध्ये मोठी तापवाट आढळत असल्याने भरारी पथकाने धडक कारवाई करून बाजारपेठ खाजगी आस्थापणे घरगुती ग्राहक इंडस्ट्रियल कनेक्शन मीटर चेक केले असता अनेकांचे मीटर बंद अवस्थेत अनेकांचे मीटर स्लो तर काहींच्या मीटरमध्ये गंभीर फेरफार केल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत त्या ग्राहकांना ताबडतोब नवीन डिजिटल मीटर देऊन दंडाची रक्कम तातडीने वसूल केली जाणार आहे कारवाई करण्यात आलेल्या ग्राहकांमध्ये दोन पोलीस कर्मचारी महावितरणचे काही कर्मचारी सरकारी नोकरी वाले व्यापारी व सर्व सामान्य घरगुती ग्राहक वीज चोरी करताना आढळून आले आहेत यामुळे भरारी पथकाला शंका येऊ लागली आहे की यामध्ये “कुंपणच तर खात नाही ना” कारण इतक्या मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असताना स्थानिक कर्मचारी अधिकारी बघ्याच्या भूमिकेत कसे ??? हा प्रश्न त्यांना पडला आहे.

*ताजा कलम*

*शेवगाव शहरातील महावितरण कार्यालयामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काही अधिकारी आणि कर्मचारी ठाण मांडून बसले आहेत त्यांची आळीमिळी आणि गुपचिळी बरच काही सांगून जाते तात्पुरत्या स्वरूपात टेम्पररी बेसवर कामास असलेले काही कर्मचारीही या वीज चोरी आणि मीटर फेरफार मध्ये सहभागी तर नाहीत ना अशी शंका त्यांना येऊ लागली आहे हमाम मे सब नंगे असा प्रकार होताना दिसत आहे*

*{ क्रमशः }*

*हजारो लाखो रुपये दंड आकारल्याने वीज ग्राहक झाले हवालदिन अनेक जण या अन्यायकारक दंडाविरुद्ध जाणार कोर्टात*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चिमूर तालुक्यातील खानगाव येथील घटना – पट्टेदार वाघाने शेतकऱ्यास केले ठार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दिनांक.१५/०५/२०२४ ला चिमूर तालुक्यात येत असलेल्या खानगाव येथे पट्टेदार वाघाने युवकास ठार …

सेंट पॉल कॉन्व्हेन्ट बामणी बल्लारपुर येथील विद्यार्थीनी स्हेनल रतन बांबोळे यांच्या सह 4 विद्यार्थ्यांनी केले सुयश प्राप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- सिबिएसई दहावीचा निकाल जाहीर झाला असून यात सेंट पॉल कॉन्व्हेन्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved