Breaking News

मोटार सायकल चोरी करणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर : – चिमूर तालुक्यात मोटार सायकल चोरीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत चालली असून अशातच पोलिसांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीला केले गजाआड,
पोलीस स्टेशन भिसी यथे आज दिनांक.15/09/2022 ला अप क्र. 115/2022 कलम 380 IPC या गुन्हाच्या तपासा दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे आरोपी नामे 1) तौफिक रफिक शेख 2) जिशांत परवेज शेख 3) मासुम देवराव शेंडे 4) सौरव चंद्रशेखर वाघमारे सर्वजण राहणार शंकरपूर येथील असून यांना भिसी पोलीस स्टेशन येथे ताब्यात घेऊन विचारपुस केली असता,

त्यांनी इतर 2 फरार आरोपीसह मिळून 3 मोटार सायकल चोरी केल्याचे व त्या मोटार सायकल काम्पा ता. नागभिड येथिल राहूल तिमाजी मोहंकर याला विकल्याचे सांगीतले, या माहितीनुसार आरोपी कडून एकुण 3 पॅशन प्रो मोटर सायकल याची एकुण अंदाजे किंमत 1,30,000 रुपयांच्या मोटार सायकल जप्त करण्यात आल्या.सदर कारवाई हि पोलीस स्टेशन भिसी ओ. पी. शंकरपुर येथिल सपोनि विनोद जांभळे ,पोहवा – दिलीप वाघमारे, सुधाकर लोहटकर, पो. अं. परमेश्वर नागरगोजे, अमित उत्कुडे, मंगेश बन्सोड यांनी केली. पुढील तपास भिसी पोलीस स्टेशन करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मालवाहू गाड्यामुळे बाजार पेठेतील रहदारीस अडथळा-नगरपरिषदेचे दुर्लक्ष

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरातील टिळक वॉर्ड येथील जुनी व मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांच्या …

ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील वीज ग्राहकांना महावितरण चा झटका

महावितरण मुंबई च्या भरारी पथकाची धडक कारवाई अनेकांची वीजचोरी पकडली मुंबईच्या भरारी पथकाने पकडले अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved