Breaking News

शिक्षक भारती जुन्या पेन्शनसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपात सहभागी होणार

१४ मार्च २०२३ पासून राज्यव्यापी बेमुदत संप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या कार्यकारिणी मंडळाने दि. १२ फेब्रुवारी २०२३ ला नागरी सेवा प्रबोधिनी नाशिक येथील सभेत सर्वांना जुनी पेन्शन लागु करावी या मुख्य मागणी साठी दि. १४ मार्च २०२३ पासुन बेमुदत संपाचा निर्णय घेतला आहे. संपाची नोटीस दि. २४ फेब्रुवारी २०२३ रोजी शासनास देण्यात येईल. बेमुदत संप १००% यशस्वी करण्याचा निर्धार कार्यकारिणी मंडळाचे राज्यातील सर्व जिल्हयाचे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. शिक्षक भारतीने ११ फेब्रुवारी रोजी झालेल्या स्नेहसंमेलनात बेमुदत संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे.

शिक्षक भारती संघटना समन्वय समितीचा घटक असून जुन्या पेन्शनसाठी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी संपात सहभागी व्हावे असे आवाहन आमदार कपिल पाटील यांनी संमेलनात केले आहे.

राज्याध्यक्ष अशोक दगडे, प्रदेश सरचिटणीस विश्वास काटकर, मध्यवर्ती संघटनेचे पदाधिकारी,सर्व जिल्हयाचे अध्यक्ष,सरचिटणीस आणि सदस्य यांसोबत राज्यभर समन्वय समितीबरोबर शिक्षक भारतीचे पदाधिकारी बैठका घेऊन संप १००% यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणार आहे,अशी माहिती म. रा. प्रा.शिक्षक भारती राज्य उपाध्यक्ष प्रकाश ब्राह्मणकर,नागपूर विभागीय सरचिटणीस सुरेश डांगे यांनी दिली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

संस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडतात – माजी सभापती नरेंद्र झंझाळ

टवेपार येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामांच्या गावात …

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

अवैधरित्या रेती वाहतूक करतांना तिन ट्रॅक्टर जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक. २८/०४/२०२४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved