आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी दिली स्कुटी भेट
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी गोंदेडा च्या सरपंच गिरजाबाई गायकवाड ला दुचाकी स्कुटी भेट दिली.दिनांक ७ जुलै ला नवीन वाड्यात,भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौ. मायाताई नन्नावरे व सहकारी महिलांच्या उपस्थितीत गिरजाबाईस चाबी देवून दुचाकी वर स्वार करून सुपूर्द केली.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज च्या तपोभूमी गोंदेडा ग्रामपंचायत च्या सरपंच पदी गिरजाबाई गायकवाड कार्यरत आहे. वयोवृद्ध असून सुद्धा गावाच्या विकास कामे व मिटिंग साठी आमदार बंटीभाऊ भांगडिया किंवा शासकीय ऑफिस मध्ये ये जा करण्यासाठी येत असतात. गोंदेडा ला वाहन व्यवस्था नसल्याने त्याना त्रास होत होता.
सरपंच गिरजाबाई गायकवाड ह्या आमदार बंटीभाऊ ना बापू म्हणून बोलत असतात. त्यांनी अडचण सांगितली. तेव्हा आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी दुचाकी स्कुटी भेट दिली. जेणेकरून गिरजा बाई आपल्या नातवाला घेऊन गाडी ने तालुक्याला येईल आणि विकास कामासाठी भेटी देईल.
सरपंच गिरजाबाई गायकवाड ला दुचाकी सुपूर्द करीत असताना भाजप महिला आघाडी च्या गीता लिंगायत, आशा मेश्राम, दुर्गा सातपुते,भारती गोडे, विना जिवतोडे,प्रतिभा गेजिक,ललिता चौधरी तसेच युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बालू पिसे, भाजप शहर अध्यक्ष सचिन फरकाडे युवा मोर्चा शहर महामंत्री श्रेयस लाखे,माजी जिप सदस्य विलास डांगे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दिनकरराव शिनगारे भाजप पदाधिकारी उपस्थित होते.