जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर / बल्लारपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात मालु वस्त्र भंडार दुकानांवर पेट्रोल बॉम्बने हल्ला करुन गोळीबार केल्याची घटना घडली असून गोळीबारात दुकानात काम करीत असलेल्या नोकराच्या एका पायाला गोळी लागली. या पेट्रोल बॉम्ब हल्ला व गोळीबारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसूनही येते आहे.
गोळीबारात दुकानातील काम करणाऱ्या नोकराला पायाला गोळी लागल्याने त्याला चंद्रपूर येथे तात्काळ हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले असून पोलिसांनी CCTV फूटेज तपासूनच त्या दिशेने तपास सुरु केला आहे. जुण्या वैमनस्यातून हे प्रकरण घडले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून मालु यांचे दुकानामागेउ शार्टसर्किट मुळे जळाले होते. ते परत नव्याने बांधून सुरु केले होते मात्र आता पुन्हा पेट्रोल बॉम्ब हल्ला करुन दुकानाच्या काचा फोडल्या गेल्याची माहिती आहे.