चिमूर मासळ जाणाऱ्या मार्गावरील घटना
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – दिनांक. १७ जानेवारी २०२५ ला सायंकाळी ०६:०० वाजताच्या सुमारास मृतक अनिल देवराव जाधव वय २२ वर्षे राहणार शिसा मासा,पोस्ट डोंगरगाव तालूका अकोला जिल्हा अकोला येथील असून चिमूर येथे सूरू असलेल्या नळ योजनेच्या कामावर कामगार मजूर म्हणून ठेकेदार मदन शेषराव अंगाईतकर यांचेकडे काम करीत होता.मृतक व त्यासोबत दोघे जण असे ट्रिपल सीट चिमूर वरून बाम्हणी येथे जात असतांना वाटेत येणाऱ्या नेरी मासळ टि पॉईंट याठिकाणी लाल रंगाच्या महिंद्रा अर्जुन 555 di क्रमांक RJ 21RF 8524 या पावडी ट्रॅक्टर ने दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी होऊन खाली पडला व त्यासोबत चे दोघे किरकोळ जखमी असून त्यावर चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.
तर चालकाला पुढील उपचारासाठी नागपूर येथे नेत असतांना वाटेत उमरेड जवळ अखेरचा श्वास सोडला. याबाबत ची चिमूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झाली असून भारतीय न्याय संहिता बी एन एस २०२३ नुसार कलम २७९, १०६(१), १२५(a), १२५ (b) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांचे मार्गदर्शनात विशाल जीवनदास गिमकर करीत आहे.