Breaking News

जिल्ह्यातील अम्युझमेंट पार्क व इंडस्ट्रीज सुरु करण्यास 22 ऑक्टोबरपासून परवानगी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर दि. 21 ऑक्टोंबर: शासनाच्या आदेशान्वये ब्रेक द चेन अंतर्गत जिल्ह्यातील अम्युझमेंट पार्क व इंडस्ट्रीज, मार्गदर्शक सूचनांचे तसेच अटी व शर्तींचे पालन करण्याच्या अधिन राहून दि. 22 ऑक्टोबरपासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी जारी केले आहे.

या आदेशानुसार जिल्ह्यातील अम्युझमेंट पार्क व इंडस्ट्रीज दि. 22 ऑक्टोंबर 2021 पासुन सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे. या आदेशाद्वारे फक्त मोकळया जागेतील कोरडया राईड्ससाठी परवानगी देण्यात येत असून यामध्ये पाण्यातील राईड्ससाठी सक्त मनाई आहे.

या आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय व कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. सदर आदेश संपूर्ण जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दि. 22 ऑक्टोबर 2021 पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहील, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांच्या आदेशात नमूद आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मातृतिर्थ सिंदखेड राजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. च्या शेकडो गुंतवणूकदारांना आधी मी कमवीन मग तुमचे पैसे फेडील

मातृ तीर्थ सिंदखेडराजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ज्या त्या मुख्य संचालकाचे सोशल मीडियावर गुंतवणूक दारांना थांबा …

भिलेवाडा येथे संस्कार शिबिरात अंधश्रद्धेवर प्रात्यक्षिके व मार्गदर्शन

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- येथून ४ किमी अंतरावर असलेल्या भिलेवाडा येथील दादाजी धुनिवाले मठात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved