Breaking News

नागपुरचे नविन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पदभार स्वीकारला

आर. विमला यांची महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त पदी बदली

नागपूर, दि. 19 : नागपूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. विपीन इटनकर यांनी आज मावळत्या जिल्हाधिकारी आर. विमला यांच्याकडून सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पद पदभार स्वीकारला.

मावळत्या जिल्हाधिकारी आर. विमला यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर नवे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आर. विमला यांना पुणे येथे बाल कल्याण विभागात आयुक्त पदावर नियुक्तीसाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ. विपीन इटनकर हे नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. ते मुळचे चंद्रपूर येथील असून 2014 च्या तुकडीचे आय.ए.एस. अधिकारी आहे. यु.पी.एस.सी. परीक्षेमध्ये राज्यातून प्रथम तर देशातून चौदावा क्रमांक मिळविला होता. त्यांनी नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. केले आहे.
*****

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 25 जून ते २४ जुलै या कालावधीत

बीएलओ करणार 25 जून ते २४ जुलै या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदार यादीची तपासणी …

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गतचे सर्व प्रस्ताव 1 जुलै पर्यंत स्विकारले जाणार

नागपूर, दि.20 : जिल्हा वार्षिक योजना 2024-25 अंतर्गत मंजूर नियतव्ययाच्या मर्यादेत येत्या 1 जुलैपर्यंत सर्व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved