Breaking News

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी उपविभागीय कार्यालयावर काँग्रेस पक्षातर्फे धडक मोर्चा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-दि. १०/११/२०२३ विजय वडेट्टीवार आमदार तथा विरोधी पक्ष नेते म.रा. , आमदार अभिजितजी वंजारी , अविनाशभाऊ वारजुकर माजी आमदार सरचिटणीस महा. प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या नेतृत्वात शुक्रवार ला सकाळी ११.०० वाजता स्थळ श्रीहरी बालाजी देवस्थान चिमूर पासून मोर्च्याची सुरूवात ते उपविभागीय अधिकारी कार्यालय तहसिल कार्यालय चिमूर याठिकाणी शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी तालुका कॉंग्रेस कमिटी चिमूरच्या वतीने आज शेतकरी धडक मोर्चाचे आयोजन केलेले आहे.

त्यामध्ये प्रमुख मागण्या (१) शेतक-यांना सोयाबीनची सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी (२) गोसीखुर्दचे पाणी शेतक-यांना मिळाले नाही. व नविन दराने शेतक-यांच्या जमिनीचा मोबदला देण्यात यावा. (३) रस्त्यांच्या कामात सुरू असलेला भ्रष्टाचार बंद करा. (४) शेतकऱ्यांना टोल फ्री नंबर वर पिक विमा कंपनी कडून प्रतिसाद मिळत नाही. व प्रचंड भ्रष्टाचार करून पिक विमा कंपन्या मालामाल झालेल्या आहे. (५) शेतकऱ्यांनी कापूस धान ई. पिकाचा विमा उतरविला परंतु बन्याच शेतकन्यांनी पाऊस उशीरा सुरु झाल्यामूळे कापसाचा विमा काढला परंतु सोयबीनचा पेरा केला, सोयाबीनचा विमा काढला व कापूस पेरला. खते, बी, बियाने किटकनाशके ई. महागडया औषधी वापरुनही बुरशीजन्य रोगाने सोयाबीन पिकले नाही (६) पशुवैद्यकीय दवाखाण्यामध्ये जनावरासाठी औषधी उपलब्ध नाही, पशु आरोग्य व्यवस्था पुर्णपणे कोलमडली आहे, दुग्ध व्यवसाय या तालूक्यामध्ये जवळपास नाहीच, उत्पादन वाढीसाठी शासकीय अधिकान्याकडून कोणतेही प्रयत्न होत नाही (७) जनावर वाटप योजनामध्ये प्रचंड भ्रष्ट्राचार झाला आहे याबाबत चौकशी समिती नेमावी. (८) ई- पिक पध्वतीमध्ये अनेक दोष असुन व्यवस्था बरोबर होत पर्यंत तलाठी यांचे माध्यमातुनच जुण्या पध्दतीने केलेली नोंद ग्राहय धरण्यात यावी (९) शेतकऱ्यांचे उर्वरीत कर्ज माफ करण्यात यावे, सक्तीची कर्ज वसुली करण्यात येवू नये.

(१०) जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी २५: मवत शेतकऱ्यांना करु असे सांगीतले परंतु शासनाने पिक विमा कंपनीकडे पुर्ण रककम न भरल्यामूळे पिक विमा कंपनी टाळाटाळ करीत आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगामातील प्रतिकुल परिस्थिती मूळे झालेले नुकसान भरपाई निश्चित करण्याबाबत प्रसिध्व केलेल्या अधिसुचनेतील अटी शिथील करणे (११) घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास रेती देण्यात यावी, रेती घाटावर कॅमेरे बसविणे व ऑनलाईन पध्दतीने रेती विक्री करणे याबाबत कार्यवाही करावी (१२) संजय गांधी निराधार योजनेचा मानधन वेळेवर देण्यात यावे (१३) महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता जळगावकर यांनी प्रचंड भ्रष्टाचार केलेला असुन शेतक-यांशी उर्मट व असभ्य व्यवहार करतात, जळगावकर यांची भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी. अनेक ट्रांसफामर जळलेले असल्यामुळे योग्य वेळेत दुरुस्ती न केल्यामुळे शेतक-यांचे पिकांचे नुकसान झाले त्याची नुकसान भरपाई विज वितरण कंपनीने बयावी, व्यावसायिक विज ग्राहकांना कनेक्शन देतांना नियमाची पायमल्ली केलेली आहे. कृषी विज पंप कनेक्शन अजुनही शेतक-यांना देण्यात आलेली नाही तरी तातडीने कृषी विज पंप कनेक्शन देण्यात यावे, घरघुती विज ग्राहकांची विज कापण्यांत येवु नये (१४ ) शेतकन्यांना वन्यप्राण्यांमूळे दिवसा शेतीपंपाला विज पुरवठा करण्याचे आवेश दयावे. (१५) घरघूती विज वरांमध्ये केलीली भरमसाट वाढ कमी करण्यात यावी (१६) रानटी डुकरे व ईतर वन्य प्राण्यांमुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना वनविभागाकडुन पुरेशी आर्थिक मदत दिल्या जात नाही त्यामुळे वनविभाग व शासनाबददल शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. म्हणुन चिमुर येथील विज वितरण कार्यालय व वनविभाग कार्यालयास शेतकरी धडक मोर्चाचे माध्यामातुन घेराव करण्यात येणार आहे. (१७) स्वस्त धान्य दुकानामधुन ग्राहकांना अर्धे अन्य धान्य देण्यात आले ते पुर्ण देण्यात यावे. (१८) ज्या शेतक-यांचे डिमांड पेंडींग आहे. त्यांना त्वरित कनेक्शन मंजुर करण्यात यावे. (१९) शेतक-यांना सोलर झटका मशीन सबसिडीवर पुरविण्यात यावी घरकुल लाभार्थ्यांना शासनाने रेती मोफत देण्यात यावी (२०) विद्युत कनेक्शन धारकाच्या परवानगी शिवाय शेतक-यांचे विद्युत कनेक्शन कापु नये. (२१) शासकिय धान खरेबी त्वरीत सुरु करण्यात यावी व प्रतीक्विंटल १००० रु बोनस देण्यात यावा (२२) रोडवर लावलेल्या व झुकलेल्या विजेच्या तारा व खंबे यांचे मेंटनस करण्यात यावे. रानडुकराचा जंगली प्राण्याचा वर्जा कमी करण्यात यावा.

(२३) शेतक-यांच्या नादुरुस्त सौर ऊर्जा पंपाची जवाबदारी स्विकारण्या या कंपनीला विचारणा करून त्वरित दुरुस्तीची कार्यवाही करावी किंवा त्याला सरसकट विजेचे कनेक्शन द्यावे. ग्रा.पं. चे वाढीव पोल मंजुर करून घरगुती मोटर देण्याची व्यवस्था करावी.व शेतक-यांच्या न्याय व रास्त असलेल्या मागण्यासाठी शेतक-यांनी संघटीत होवुन आपला आवाज बहि-या सरकारपर्यंत पोहाचविण्याकरीता या मोर्चाचे नेतृत्व करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे विरोधी पक्षनेते मा. ना. विजयभाऊ वडेट्टीवार, महाराष्ट्र राज्य विधानपरिषदचे आमदार अभिजितजी वंजारी, चिमुर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ. अविनाशभाऊ वारजुकर, चिमुर विधानसभेचे समन्यवयक डॉ. सतिशभाऊ वारजुकर, महाराष्ट्र राज्य सेवादलाचे सहसचिव प्रा. राम राऊत सर, महाराष्ट्र राज्य ओबीसी संघटक धनराजभाऊ मुंगले चंद्रपुर जिल्हा कॉंग्रेस सरचिटणीस गजाननभाऊ बुटके, चिमुर तालुका ओ बी सी अध्यक्ष माजी जि.प. सदस्य विलासभाऊ डांगे चिमुर, माजी अध्यक्ष जि.म. सह. बँक चंद्रपूर संजय डोंगरे कॉंग्रेस नेते, किशोरबापु शिंगरे अध्यक्ष सेवादल, माधवबापु बिरजे, संजय घुटके उपस्थित राहणार आहेत. तरी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी आपल्या हक्कासाठी या मोर्चात सामील होऊन आपली ताकद दाखवावी अशी काँग्रेस पक्षातर्फे विनंती करण्यात आली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नागपूर जिल्ह्यासाठी गुरुवारी ऑरेंज अलर्ट

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर : -भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यामध्ये 9 मे रोजी वादळीवारा, वीज, गारपीट व …

जंगलात लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह

हत्या की आत्महत्या? जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर:-चिमूर तालुक्यात नेरी पासून जवळच असलेल्या रामपुर येथील जंगलातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved