एस टी बसेस मोठ्या प्रमाणावर शासन आपल्या दारी कार्यक्रमास्थळी
भाऊबीजेचा सण आणि एस टी बस डेपोमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी
यास दोषी कोण ?
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – चिमूर आगार ने प्रवाशांचे कोणतेही विचार न करता बसेस भंडारा येथे शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्याकरीता दिनांक १९/११)२०२३ ते दिनांक २०/११/२०२३ पर्यत चिमूर आगार ने भंडारा येथे १० बसेस पाठविल्या त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. तासन तास बसेसची वाट पाऊन जेव्हा बस लागत नाही, त्यावेळी काही प्रवाशांनी चौकशी विभागात विचारांना केली असता दहा बसेस भंडारा येथे पाठविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. दिवाळी, भाऊबीज सणासुदीच्या दिवसांत प्रवाशांची संख्या अधिक असते अशावेळी एसटी बसचा तुटवडा म्हणजे प्रवाशांना नाहक त्रास देणे होय. त्यामुळे प्रवाशांना ना-इलाजाने प्रावेट गाड्यांनी जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे.या कार्यक्रमास शासन आपल्या दारी म्हणावे कि जनता शासन दरबारी ? जनतेला विचार करण्यास प्रवृत्त करणारी बाब आज शासन आपल्या दारी ठरली आहे.