Breaking News

मालेवाडा येथील जेतवन बुद्ध विहारात त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे दि.7 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी ठीक 9.30 वाजता त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला सत्यफुलाबाई चव्हाण व शोभाबाई गजभिये यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन केले.डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाला खऱ्या अर्थाने खंबीरपणे साथ देणाऱ्या, बाबासाहेबांना घडविणाऱ्या त्यांच्या पत्नी माता रमाई यांनी प्रचंड हाल अपेष्टा सहन करुन बाबासाहेबांच्या कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

या मातेने आपल्या इच्छा -आकांक्षाना मूठमाती देऊन बाबासाहेबांना समाजहीतासाठी लढण्यास प्रोस्ताहीत केले. माता रमाई बाबासाहेबांच्या आयुष्यात आल्या नसत्या तर एवढ्या प्रचंड विद्वतेचा निस्वार्थ नेता कधीच घडला नसता, अशा शब्दात मान्यवरांनी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं.या प्रसंगी भिमज्योती महिला मंडळ, बौध्द पंच कमेटी मालेवाडा तथा गावातील नागरिक उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

राष्ट्रसंतांची संकल्पना रूजविण्यास शिबिर महत्त्वाचे – प्रतिकुमार टांगले

भिलेवाडा येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- स्पर्धेच्या युगात वावरत असतांना बहुतेक …

नागपूर जिल्ह्यासाठी गुरुवारी ऑरेंज अलर्ट

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर : -भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यामध्ये 9 मे रोजी वादळीवारा, वीज, गारपीट व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved