Breaking News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वार्ड क्रमांक ५३ च्या माजी नगरसेविका रेखा रामवंशी यांचा आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक ५३ च्या माजी नगरसेविका रेखा रामवंशी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज  शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच यावेळी राज्य ग्रंथालय महासंघाचे बी. जी. देशमुख यांच्यासह त्यांच्या संघटनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

राज्यातील महायुती सरकारने केलेल्या लोकाभिमुख कामांवर विश्वास ठेवूनच आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या ५३ माजी नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असून दिवसागणिक ही संख्या वाढत आहे. मुंबईचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शहराचे सुशोभीकरण, संपूर्ण स्वच्छता अभियान असे अनेक उपक्रम राबवण्यात येत असून हे शहर खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय शहर ठरावे यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.यावेळी उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, शिवसेना सचिव संजय मोरे, माजी आमदार शरद सोनवणे उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

कृपया लक्ष द्या – हरवले आहेत

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव शेवगाव:-गेल्या पंधरा दिवसापासून राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता पायी घराबाहेर …

14 मे पर्यंत जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी

नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved