Breaking News

ग्रामपंचायतचा कूलर ग्रामपंचायत सदस्याच्या घरी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-वरोरा तालुक्यातील बोडखा ग्रामपंचायत नेहमी कोणत्या नाही कोणत्या चर्चेत असते. या ग्रामपंचायत मध्ये चक्क ग्रामपंचायत सदस्यांने स्वतः कूलर उचलून,ग्रामपंचायतला खाजगी प्रॉपर्टी समजत आहे. आता तर चक्क कूलरच स्वतःच्या घरात नेल्याने ही तर सदस्यांची हुकूमशाही आहे यात ग्रामपंचायत चपराशी यांनी कूलर घरी नेण्यास मदत केली अशी चर्चा गावात रंगली आहे. जलजिवन मिशन अंतर्गत पाणीच्या टाकीचे काम सुरु आहे.या टाकीचे कामगार सध्या ग्रामपंचायतच्या हॉल मधे झोपतात,  तेव्हा एक ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत चपराशी ग्रामपंचायत मध्ये आले व कामगाराणा धमकावुन कुलर घेउन गेले.

त्यामुळे ही माहिती ग्रामवासी यांनी शिवसेना विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे यांना दिली असता त्यांनी तात्काळ ग्रामपंचायत मध्ये धाव घेतली. तिथे कामगारांनाशी सवांद साधुन सविस्तर माहिती घेतली असता चक्क कुलरच ग्रामपंचायत मध्ये नव्हता.. त्यामुळे काल दिनांक 23 मे 2024 गुरुवारला ही घटना घडल्याने व बुद्ध पौर्णिमा असल्याने शासकीय सुट्टी होती. त्यामुळे गणेश चिडे यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती वरोरा यांना कॉल द्वारे माहिती दिली 24 मे 2024 रोज शुक्रवारला आज गणेश चिडे यांनी गटविकास अधिकारी यांना पंचायत समिती वरोरा येथे जाऊन निवेदन दिले व सविस्तर विषय समजावून सांगितले. लवकरच कूलर संदर्भात चौकशी करण्यात येईल अशी माहिती गट विकास अधिकारी वरोरा यांनी दिली. त्यामुळे ग्रामपंचायत सरपंचाचे ग्रामपंचायतवर दुर्लक्ष आहे असे निर्देशनास येत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

बांबू संशोधन प्रशिक्षण संस्थेला देशातील अग्रगण्य संस्था करणार

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- बांबू क्षेत्रात संशोधन …

हायकोर्टाच्या टिकेनंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनीही पत्रकारांवरील हल्ल्यांचा केला जाहीर निषेध

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755 शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की अलीकडच्या काळामध्ये वार्ताहर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved