विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव आगाराची शेवगाव मायंबा बस श्रीक्षेत्र मायंबा येथे मुक्कामी जात असताना अमरापूर ते सावरगाव प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स बसमध्ये विसरून राहिली असता मुक्कामाच्या ठिकाणी मायंबा येथे पोहोचल्यावर एस.टी. वाहक श्री संकेत शिरसाठ यांना पर्स आढळली व इतर प्रवाशांसमक्ष पर्स तपासले असता पर्समध्ये दागिने व रोकड रक्कम असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सदर पर्स ही अमरापूर वरून बसलेल्या महिलेची असल्याचे समजले त्यानंतर दुसऱ्या दिवशी पैठण कडे जात असताना सावरगाव येथे ग्रामस्थांच्या समक्ष सदर पर्स श्री कुशाबा आसाराम म्हस्के यांच्या पत्नीची असल्याचे खात्री झाली व इतर सर्व गोष्टींची खातरजमा करून सुपूर्द करण्यात आली,,, आपली पर्स सुखरूपरीत्या मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी चालक श्री बाळासाहेब दहिफळे व वाहक ही संकेत शिरसाठ यांचे आभार मानले.
*ताजा कलम*
*जगात सगळीकडे संधी साधूपना वाढलेला दिसत असताना आपल्या कामाशी कर्तव्याशी आणि कामाकडे समर्पण भावनेने निष्ठावान असलेले एस. टी. कर्मचारी बांधव यांच्याकडे राज्य सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून प्रवाशांची ज्ञान करणाऱ्यांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून सामील करून घेतले नाही आपला जीव धोक्यात घालून जनतेची सेवा करणाऱ्यांना सरकारने सातवा वेतन आयोग लागू करून राज्य सरकारच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व लाभ आणि भत्ते दिले पाहिजेत अशी मागणी या निमित्ताने मी शेवगावकर संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*