व्यापारी प्रतिष्ठान ,शाळा, कॉलेज बंद ठेवून शंभर टक्के दिला प्रतिसाद
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674
( भंडारा ) – दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोज बुधवार ला दुपारी 12 वाजता संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती उपवर्गीकरण व अनुसूचित जाती, जमाती यांना क्रिमिअर अट लागू करा याबाबत सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला तो अनुसूचित जाती जमाती फूट पाडण्याचा असून जातीत तेढ निर्माण करण्याचा तो प्रकार असून भविष्यात अनुसूचित जाती ,जमातीचे आरक्षण संपवण्याचा हा डाव आहे तो निर्णय सुप्रीम कोर्टाने मागे घ्यावा व या निर्णयाची संसदेने अंमलबजावणी न करता संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला तो रद्द करण्यात यावा याकरिता भव्य मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते .सदर मोर्चा पवनी तालुक्यातील अड्याळ येथील बाजार चौक येथून निघून मोर्चाचे रूपांतर ग्रामपंचायत समोरील भव्य पटांगणात सभेत करण्यात आले .मोर्चाला माजी प्रभारी सरपंच मुनिश्वर बोदलकर ,डॉ .गणेश मेश्राम ,ग्रामपंचायत सदस्य आशिष नैतामे ,सामाजिक कार्यकर्ते तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे ,सामाजिक कार्यकर्ते बालक गजभिये ,शिवप्रसाद पेंदामे यांनी संबोधित केले.
मोर्चा शांततेत पार पडला. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. पवनी येथील तहसीलदार मोर्चा स्थळी उपस्थित न झाल्यामुळे अड्याळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनंजय पाटील यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,राज्यपाल, राष्ट्रपती पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले. देण्यात आलेल्या निवेदनाच्या प्रमुख मागण्यांमध्ये अनुसूचित जातीचे वर्गीकरण व अनुसूचित जाती जमातींना क्रिमिलियर न लावता संसदेत घटनादुरुस्ती करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करण्यात यावा, न्यायाधीशाच्या नियुक्तीसाठी कालेजीएम पद्धत बंद करून न्यायाधीशांची नियुक्ती ऑल इंडिया जुडे सर्विस चे गठन करून एससी ,एसटी ,ओबीसी, भटक्यांचे आरक्षणाला कायदेशीर करण्यासाठी आरक्षण लागू करावे, एससी एसटी ओबीसी भटक्यांचे आरक्षणाला कायदेशीर करण्यासाठी संविधानाच्या शेडूल 9 मध्ये त्यांचा अंतर्भाव करण्यात यावा, सर्व जातीसमूहाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, खाजगी संस्थांमध्ये आरक्षण लागू करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.
निवेदन देताना माजी सरपंच मुनेश्वर बोदलकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष चिंटू अंबादे, सामाजिक कार्यकर्ते बालक गजभिये, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, ग्रामपंचायत सदस्य आशिष नैतामे, दिलीप वलके, पंचायत समिती सदस्या स्मिता गिरी,पत्रकार जयेंद्र चव्हाण, प्रतीक रामटेके ,कमलेश चव्हाण सत्यजित चव्हाण, आशिष अंबादे मुकेश देशपांडे, डॉ.संघरत्ने,भीमराव खोब्रागडे, अमित रामटेके ,अश्विन मडकवार आशिष मेश्राम ,शिवप्रसाद पेंदामे परीस कोडापे ,रमेश बनसोड, सुरेश कोडापे, प्रेमसागर गजभिये ,देवदास कोडापे ,श्रीहरी खरवडे, रामदास खोब्रागडे, कल्पना जांभुळकर, प्रीती आजबले, चंदन राऊत, प्रशांत शहारे,नरेंद्र पंधरे ,मधुमाला कोडापे, पारस कोडापे,राजेश बनसोड ,सुरेश कोडापे,देवदास कोडापे ,अनिल मेश्राम, कल्पना जांभुळकर , रविकिरण राऊत,भीमराव वाहने ,अमोल धारगावे ,सुमित बावणे, गौरव टेकाम, माया खोब्रागडे ,भारती कोडापे, कल्पना कोडापे, नर्मदाबाई वेलके, दिलीप ढवळे ,देवनाथ देशपांडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. मोर्चा च्या बंदला सहकार्य करिता व्यापारी प्रतिष्ठान यांनी मोलाचे सहकार्य केले. सर्व नागरिक व महिला यांनी बंद आंदोलनात सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले. त्याचप्रमाणे पोलिसांनी सुद्धा कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी प्रामाणिक सांभाळल्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानण्यात आले .