तान्हा पोळ्यातील त्या लहान मुलांना दिल्या सायकली
मंदिराच्या बांधकामासाठी आर्थिक मदत
दर्जेदार शिक्षण व्यवस्था सुरू करण्याचा प्रयत्न-आमदार बंटी भांगडीया
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- आमदार बंटी भांगडिया यांनी चिमूर आबादी मधील तान्हा पोळा प्रसंगी अतिथी म्हणून आले असता लहान मुलांनी त्यांच्या भोवती येऊन सायकल ची मागणी केली होती. तेव्हा लहान मुलांना शब्द दिला होता आणि आज शब्द पूर्ण करीत १० मुली मुलांना सायकल वाटप करण्यात आले.
मंदिराच्या बांधकामासाठी आर्थिक मदत
चिमूर शहरातील माँ दुर्गा माता नगरी चिमूर येथील हनुमान मंदिराकरीता बांधकामासाठी शनिवार ला आमदार बंटी भांगडिया यांनी आर्थिक मदत दिली. चिमूर येथील माँ दुर्गा माता नगरीमध्ये हनुमान मंदिर आहे. येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी व भक्तगणानी आ. बंटी भांगडिया यांच्याकडे निवेदनाद्वारे मंदिर बांधकाम सहाय्यता निधीची मागणी केली असता तात्काळ आर्थिक मदत दिली.आ. भांगडिया यांनी हनुमान मंदिर बांधकामसाठी आर्थिक निधी दिल्याबद्दल भाऊंचे आभार भाष्कर बावनकर यांनी मंदिर कमिटी च्या वतीने व्यक्त केले.
दर्जेदार शिक्षण व्यवस्था सुरू करण्याचा प्रयत्न आमदार बंटी भांगडीया
माजी राष्ट्रपती डॉ.राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिक्षक दिन कार्यक्रम व शिक्षक सत्कार सोहळा कार्यक्रम आ.बंटी भांगडीया यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाप्रसंगी आमदार कीर्तीकुमार बंटी भांगडीया यांनी स्वतः उपस्थित सर्व शिक्षकांचा सत्कार केला.
चिमूर विधानसभा क्षेत्रात राजकारण सह समाजकारण करीत असतांना विरोधक मात्र शिक्षण व्यवस्था नसल्याचा कांगावा करीत आहे. शिक्षण व्यवस्था मधून आपणास लूट करायचे नाही. चिमूर क्षेत्रातील गोरगरीब सामान्य विद्यार्थ्यांना उत्तम दर्जेदार शिक्षण व्यवस्था सुरू करण्याचा विचार मंथन सुरू आहे. भवन सारखी मोफत शिक्षण व्यवस्था उभी करण्याचे प्रयत्न असल्याचे सांगत आमदार कीर्तीकुमार बंटी भांगडीया यांनी शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असून सोबत असल्याचे शेवटी सांगितले. यावेळी कार्यक्रमाला भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.