मुख्य रस्त्याच्या मधोमध बसली असतात मोकाट जनावरे
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर शहरातील ३५३ ई राष्ट्रीय महामार्गावर दिवसेनदिवस कुत्रे, डुक्कर, गाय बैल,गधे या सारखी मोकाट जनावरे यांचा त्रास फार मोठ्या प्रमाणात वाढलेला याकडे चिमूर नगरपरिषदेच जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मुख्य रस्त्यावर जनावरे बसत असल्याने रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाल्याने अपघाताचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढले आहे.मात्र या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यास नगरपरिषद असमर्थ ठरत आहे. गुरांचे प्रमाण रस्त्यावर बसण्याचे जास्तच वाढले असून या गुरांना पकडून त्यांच्या मालकांवर सुध्दा कारवाई करण्यात यावी. गुरांना मोकाट सोडल्याने ती रात्रंदिवस शहरातच असतात त्यामुळे रात्रीदरम्यान कुणाच्या घरासमोर तर व्यवसायीकांच्या दुकानासमोर घाण करुन ठेवत असतात.यामुळे नागरिक व व्यवसायीक सुध्दा त्रस्त झाले असून कित्येकदा अपघात सुध्दा झाले आहे.मात्र या मोकाट जनावरांचा अजूनही चिमूर नगरपरिषदेने बंदोबस्त केला नाही.
किती अपघाताची वाट पाहणार चिमूर नगर परिषद मोकाट जनावरांचा बंदोबस्त होणार तरी केव्हा? याकडे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.