जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- स्थानिक विवेकानंद माध्यमिक विद्यालय वरोरा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमांचे अध्यक्ष स्थान विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ठेंगणे मॅडम यांनी भूषविले होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका कू.वैशाली देवतळे मॅडम उपस्थित होत्या.कार्येक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
विद्यालयातील काही विद्यार्थांनी क्रांती ज्योती सावित्री बाई फुले यांच्या जीवनकार्याविषयी माहिती सांगितली.तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा ठेंगणे मॅडम यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या कु.देवतळे मॅडम यांनी सुद्धा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन पटावर मोलाचे मार्गदर्शन केले. कार्येक्रमाचे सूत्र संचालन उरकांडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन चौधरी सर यांनी केले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवदनेने झाली.या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.