पालकमंत्री शेतकऱ्यांच्या समस्या सोडवतील का ?
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चंद्रपुर: चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासुन संपुर्ण युरिया खताचा तुटवडा निर्माण झालेला आहे असे असुन धान उत्पादक शेतकरी युरिया खत न मिळाल्याने हवालदिल झाला आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना या वेळात,धान पिकांच्या पोषणासाठी व अधिक उत्पादनासाठी युरिया खताची आवश्यकता असते आणि ज्या पिरेड मध्ये युरिया खताची आवश्यकता असते,त्याच वेळेत युरिया खताचा तुटवता होत असल्याने शेतकऱ्यां मध्ये नैराश्य पसरले आहे.
येत्या एक महिन्यामध्ये धान (तांदूळ) शेतीचा शेवट होणार असून,आता येणारे पंधरा दिवस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत या पंधरा दिवसाच्या कालावधी मध्ये शेतकरी आपल्या धानावर युरिया खताची मात्रा देतात परंतु जेव्हा शेतकऱ्यांना युरिया खताची आवश्यकता निर्माण होते तेव्हा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांची युरिया खतासाठी अडवणूक केल्या जाते,व खताचा तुटवडा निर्माण केला जातो शेतकरी मागील काही दिवसापासून कृषी केंद्राकडे चकरा मारत असून कृषी केंद्रामध्ये युरिया खत नाही अशी उत्तरे कृषी केंद्र चालक यांच्याकडून मिळतात.
परत काही कृषी केंद्र चालक निव्वळ युरिया खत मिळणार नाही,त्याबरोबर तुम्हाला दुसऱ्या खताची बॅग न्यावी लागणार असे उत्तर देतात अशा प्रकारे शेतकऱ्यांना वेठीस धरल्या जात असल्याचा प्रकार सुध्दा समोर आला आहे चंद्रपूर शहरात जनता कर्फ्यु सुरू असल्यामुळे सुद्धा युरिया खताचा कुत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे अशी उत्तरे केंद्र कृषी केंद्र चालक यांच्याकडून मिळत आहेत.
कोरोना ची साखळी तोडण्यासाठी,पालकमंत्र्यांनी चंद्रपूर शहराला जनता कर्फ्यु लागू केले आहे ज्या पद्धतीने पालकमंत्र्यांनी कोरोणाच्या संक्रमणातून चंद्रपूर जिल्ह्याला वाचवण्याचा चंग बांधला आहे,त्याच पद्धतीने जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे पालकत्व स्वीकारून युरिया खताचा होणारा हा तुटवडा भरून काढावा अशी आर्त हाक येथील शेतकऱ्यांची आहे.