Breaking News

खाजगी हॉस्पिटल,कोरोना तपासणी व प्लाझ्मा लॅबवर गृह खात्याची करडी नजर

  • जनतेची लुबाडणूक करणाऱ्या आस्थापनांची आकस्मिक पथकाद्वारे पाहणी
  • गृहमंत्री अनिल देशमुख यांचा इशारा

नागपूर दि. 26 : कोरोना आजारामुळे त्रस्त असणाऱ्या नागरिकांना अव्वाच्यासव्वा बिल आकारणी करणे, शासकीय निर्देशानुसार तपासणीचे पैसे न घेता अतिरिक्त शुल्क आकारणे, अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. यासाठी प्रसंगी स्ट्रिंग ऑपरेशन सारख्या आकस्मिक भेटीच्या गुप्त मोहीम राबवून खासगी हॉस्पिटल, खासगी कोरोना तपासणी लॅब तसेच खासगी प्लाझ्मा लॅबवर करडी नजर ठेवली जाईल. सामान्य नागरिकांची लुबाडणूक करणाऱ्या कोणत्याही आस्थापनांची गय केली जाणार नाही, असे स्पष्ट संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिले आहे.

नागपूरमध्ये एकीकडे कोरोना मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी ‘ ही मोहीम घेऊन महाराष्ट्र कोरोना मुक्त करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अशा परिस्थितीत अनेक खासगी रूग्णालय शासकीय नियमानुसार रुग्णसेवा करत आहेत, पण काही खासगी हॉस्पिटल, खासगी तपासणी प्रयोगशाळा, प्लाझ्मा प्रयोगशाळा, याठिकाणी लूट होत असल्याचे पुढे आले आहे. लोकप्रतिनिधी तसेच पोलिसांकडे तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा वेळी शासकीय नियमाची पायमल्ली करून अतिरिक्ति पैशाची मागणी करणाऱ्या वैद्यकीय आस्थापनांना मोकळीक दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सोबतच शहरातील अनेक खासगी हॉस्पिटल या महामारीमध्ये प्रशासनासोबत उत्तम काम करत असून अशा सामाजिक जाणिवेतून काम करणाऱ्या हॉस्पिटलची नोंद गृह खात्याने घेतली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सोमवारपासून स्ट्रींग ऑपरेशन 

महानगरपालिका, पोलीस प्रशासन, अन्न व औषधी प्रशासन या विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणाऱ्या वेगवेगळ्या चमू तयार करून नागपूर शहरातील विविध खासगी हॉस्पिटल, लॅब व प्रयोगशाळांना आकस्मिक गुप्त भेटी देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सोमवारपासून ही कारवाई सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

टोल फ्री क्रमांक जाहीर

यासाठी पोलीस विभागाचा टोल फ्री क्रमांक १०० आणि व्हाटसअॅप क्रमांक ९८२३३००१०० जाहीर केला आहे. सामान्य नागरिक दोन्ही क्रमांकावर अडवणूक केल्याची तक्रार नोंदवू शकतील. त्यानंतर संबंधित आस्थापनाला या संदर्भातील जाब विचारला जाईल.

होम कॉरन्टाईन बाहेर पडल्यास दंड

शहरांमध्ये मृत्युदर एकीकडे वाढत असताना काही बेजबाबदार नागरिक होम कॉरन्टाइन असताना देखील बाहेर फिरत आहेत. स्वतःसोबत, स्वतःच्या कुटुंबासोबत, समाजातील नागरिकांचा जीव देखील धोक्यात आणत आहे. अशा बेजबाबदार लोकांवर कारवाई करण्यात येईल. यासाठी आता गृह अलगीकरणात असणाऱ्या नागरिकांना स्टॅम्प मारण्याचे देखील सुचित करण्यात आले आहे.
नागरिकांनी सध्याच्या परिस्थितीत काम नसताना घराबाहेर पडूच नये. तसेच मास्कचा वापर करावा.मास्क न वापरल्यास पाचशे रुपये दंड आकरण्यात येत आहे. सोमवारपासून अधिक सक्तीने ही मोहीम राबविण्याचे निर्देश पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. कोणत्याही परिस्थितीत नागपूर शहर व जिल्ह्यातील कोरोना मृत्युदराची संख्या कमी करायची आहे. यासाठी नागरिकांनी आणखी चांगल्या प्रकारे सहकार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले.

नागरिकांनी महानगरपालिकेने जारी केलेल्या टोल फ्री क्रमांकावरूनच हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी पर्याय निवडावा. खाजगी हॉस्पिटलचे महानगरपालिकेमार्फत ऑडिट होत असून अशा पद्धतीची लूट होत असल्यास महानगर पालिकेच्या O712-2567021 या क्रमांकावर लक्षात आणून द्यावे. तसेच मास्क वापरणे व सोशल डिस्टंसिंग पाळणे यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा समृद्धी महामार्गावर भिषण अपघात, २५ प्रवाशांचा मृत्यू

नागपूर / बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याला जाणारी बसचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ …

राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर स्वागत 

नागपूर दि.२३ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आगमन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved