
नागपुर :- प्रभाग 26 अंतर्गत येत असलेल्या भांडेवाडी डंपीग यार्ड येथे रोज हजारो कचरा गाड्यां येत-जात असतात. परंतु येथील रसत्यावर पडलेल्या खड्यांमुळे कचरा गाडीतील काही कचरा रसत्यावर पडत – पडत डंपीग यार्ड मध्ये पोहचतो. डंपीग यार्ड कडे जाणारा रस्ता पुर्णपने धुलमय झालेला आहे, तसेच रसत्यावर पडलेले खड्डे नागरीकांसाठी त्रासदायक ठरलेले आहे.
या रसत्यासंदर्भात समस्या अनेकदा जनप्रतिनीधी तसेच प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन देवुन त्यांचा निर्देशनास आणुन दिले तरीही सर्व जनप्रतिनीधी व प्रशासकीय अधिकारी यांनी दखल घेतली नाही.
पुर्व नागपुर येथे येत असलेला या प्रभागामध्ये 1 आमदार, उपमहापौर, 5 सभापती तसेच एक विधी सभापती असुन सुद्धा सर्व जनप्रतिनीधींचे येथील समस्या कडे दुर्लक्ष असल्याचं आरोप युवासेनेचे सचिव गौरव गुप्ता यांनी केलेले आहे.
वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाने दखल न घेतल्याने नागरीक संतापले आहे, गौरव गुप्ता यांनी मागणी केली आहे की, दररोज रसत्याची सफाई करण्यात यावी तसेच ताबड़तोड रस्ता दुरुस्त करण्यात यावे अन्यथा शिवसेना / युवासेनेच्या नेतृत्वात जन आंदोलन करण्याची चेतावनी युवासेनेचे शहर सचिव गौरव गुप्ता यांनी दिलेली आहे.