
नागपुर :- नागपुर जिल्हातील कुही तालुक्यातुन 16 कि.मी अंतरावर असलेले डोंगरगाव शिवार येथे आज सोमवार सकाळी 7 -8 वाजताच्या सुमारास 2 शव आढळुन आले स्थानीय नागरीकांनी पोलीसांना सुचना दिली असता पोलीसांनी घटनास्थळ गाठुन दोन्ही मृतकांचे पंचनामा करुन शव पोस्टमार्टम करीता पाठविले. मृतकांचे परीजनांचा शोध घेतला असता परीजनांचा सोबत मृतकांची सुद्धा ओळख पटली. मृतक 1) कुणाल सुरेश चरडे वय 29 वर्षे रा. दिघोरी 2) सुशील सुनिल बावणे वय 24 वर्ष रा. दिघोरी पोलीसांनी हत्या चे प्रकरण नोंद करुन आरोपींचा शोध घेणे सुरु केले.
पोलीसांनी तपास सुरु करताच अवघ्या 6 तासाच्या आत संशयाच्या आधारे 3 आरोपींना अटक केले, आरोपी 1)राहुल श्रावण लांबट, भांडेवाडी पारडी 2) निशांत प्रशांतराव शाहकर शक्तीमाता नगर खरबी, 3)जागेश्वर संतोषराव दुधनकर तिन्ही आरोपींनी अज्ञात कारणांवरुन धारदार शस्त्रांनी व सिमेंट कॉंक्रीटच्या खांबाने डोक्यावर, पाठीवर, दुखापात करुन कुणाल व सुशील ला जिवनीशी ठार मारल्याची गवाही दिली. हत्याचे मुख्य कारण चे तपासात निष्पन्न होईल. सदर खुणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक पंजाबराव परघणे करीत आहे.
सदर घटनास्थळी नागपुर ग्रामीण चे पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, गृह पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे यांनी भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतले. गुन्हेशाखेच्या पथकामध्ये पोउपनि सचिन मते, नरेंद्र गौरखेडे, जावेद शेख, रमेश भोयर, महेश जाधव, मदन आसतकर, गजेंद्र चौधरी, ज्ञानेश्वर राऊत, सुरेश गाते, अमृत किनगे, राधेश्याम कांबळे, अमोल वाघ, विपीन गायधने, भाऊराव खंडाते, अमोल कुथे यांनी कारवाई पार पाडली.