जिल्हा प्रतिनिधी/ सुनिल हिंगणकर
चिमूर : – राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी जनतेला ३०% वीज स्वस्त करण्याचे वनच दिले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवून हे सरकार सत्तेवर आले आहे. महाराज जनतेला जे वाचन द्यायचे त्याची पूर्ती करायचे खोटे बोलणाऱ्याला कडक सजा द्यायचे. परंतू, उद्धव ठाकरे यांनी वीजबिलाच्या मुद्द्यावर खोटे वचन देवून जनतेची फसवणूक केली असल्याचे आरोप आम आदमी पार्टी ने केले आहे.
सरकार ने विजेचे दर वाढवून धोकाधडी केली तसेच वीजबिल कमी करण्याच्या मुद्द्यावर सरकारने जनतेला फसविले असल्याचे ही आंदोलन करते म्हणाले. या करीता आम आदमी पार्टी ने राज्यव्यापी ‘घंटानाद’ आंदोलन करीत असून चिमूर विधानसभेतील चिमूर आणी नागभीड तालुक्यात आप चे चंद्रपुर ज़िल्हाप्रमुख सुनिलजी मुसळे यांच्या मार्गदर्शनात प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वात घंटानाद आंदोलन करून सरकारच्या वचननाम्याची होळी करण्यात आली.
या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी आम आदमी पार्टी चे आदित्य पिसे, विशाल इंदोरकर, मंगेश शेंडे, , विशाल बारस्कर, सुदर्शन बावणे ,त्रिलोक बघमारे, कैलास भोयर, विलास दिघोरे, पंकज शंभरकर , समिधा भैसारे, छबुताई नन्नावरे , ज्योती बावणकर ,वर्षा पेटल, वंदना घोनमोडे, लिलाताई गोटे उपस्थित होते.