Breaking News

राजकारणी नाही तर समाजकारणी कार्यकर्त्याला निवडून द्या : डॉ. परिणय फुके

भंडारा जिल्ह्यात झंझावाती संपर्क दौरा

भंडारा:- पदवीधरांचा उमेदवार हा त्याच्या कार्यकर्तृत्वाने ठसा उमटवलेला असावा. त्याची ओळख त्याच्या कर्तृत्वाने असावी. समाजातील विविध समस्यांची जाणीव ठेवून त्यासंबंधी कार्य करणारा तो असावा. पदवीधरांनो आपला प्रतिनिधी म्हणून राजकारणी नाही तर समाजकारणी कार्यकर्त्याला निवडून द्या, असे आवाहन माजी राज्यमंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी केले.

भाजप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ), बहुजन रिपब्लिकन एकता मंच व खोरिप महायुतीचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी यांच्या मोहाडी येथील प्रचारसभेत ते बोलत होते. लाखनी येथील प्रचारसभेत पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेने सुद्धा पदवीधरांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी समर्थन दिले. संदीप जोशी यांनी लाखनी शहरातील समर्थ विद्यालयात दिवंगत बापुसाहेब चिखलीकर यांच्या स्मृतीला वंदन केले व शिक्षकवृंदांशी संवाद साधला.

संदीप जोशी यांनी मंगळवारी (ता.२४) भंडारा जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली, लाखांदूर, पवनी, जवाहरनगर आदी ठिकाणी संपर्क दौरा केला. विविध ठिकाणी झालेल्या सभेमध्ये भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे, माजी राज्यमंत्री आमदार डॉ.परिणय फुके, माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, भाजपा भंडारा जिल्हा अध्यक्ष प्रदीप पडोळे, माजी खासदार शिशुपाल पटले, महिला आघाडी अध्यक्षा गीताताई कोंडेवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे, डॉ. कल्याणी भुरे, डॉ. हिवराज जमीरवार, डॉ. गोविंद कोठाणी, जिल्हा महामंत्री मुन्नाभाऊ फुंडे, तुमसर शहर अध्यक्ष ॲड.आशिष कुबडे, तुमसर ग्रामीण अध्यक्ष ॲड. विजय पारधी, महिला नेत्या कुंदाताई वैद्य, मोहाडी येथे विकास फाऊंडेशनचे हंसराजजी आगासे, यादवराव कुंभारे, अफरोज पठाण, माजी सभापती हरीशचंद्र बंदाटे, सेवक चिन्नलोरे, चंद्रशेखर भिवगडे, बंडूभाऊ बनकर, मेहताष ठाकुर, लाखनी येथे आल्हाद भांडारकर, मधुकर लाड, धनंजय घाटबांधे, भरत खंडाईत, शिक्षक परिषदेचे के.डी. रोकडे, महाराष्ट्र इंजिनिअर असोसिएशनचे रवी रहांगडाले, साकोली येथे डॉ.ब्रम्हानंद करंजेकर, माजी आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते, भाजपा तालुका अध्यक्ष लखन बर्वे, रेखाताई भाजीपाले, सैय्यद मुजानद्दीन, घनश्याम निखाडे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व पदवीधर मतदार उपस्थित होते.

पुढे बोलताना माजी राज्यमंत्री आमदार डॉ परिणय फुके म्हणाले, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ हा पंडीत बच्छराज व्यास, गंगाधरराव फडणवीस यांच्यापासून ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गड आहे. पदवीधरांचा प्रतिनिधी हा पदवीधरच असावा, असे सांगणाऱ्या प्रा. अनिल सोले यांचाही गड आहे. पदवीधरांचा उमेदवार हा त्याच्या कार्यकर्तृत्वाने ठसा उमटवलेला असावा. त्याची ओळख त्याच्या कर्तृत्वाने असावी, असा कर्तृत्ववान उमेदवार भारतीय जनता पक्षाने दिला, याचा आनंद आहे.

संदीप जोशी यांनी नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, सत्तापक्ष नेते, लघु उद्योग मंडळाचे अध्यक्ष, महापौर या सगळ्याच पदांना त्यांनी न्याय दिला, लोकांच्या चिरकाल स्मरणात राहतील अशी असंख्य कामे केली. भविष्यातही ते उत्तमच कामे करतील, तरूणांचे, शिक्षकांचे, पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावतील, रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात म्हणून प्रयत्न करतील यात काही शंका नसावी, कार्यकर्ता ते महापौर असा संदीप जोशी यांचा प्रवास आहे. यावेळी पक्षाने संदीप जोशी या युवा कार्यकत्त्यास संधी दिली आहे. आपण आपली पहिली पसंती त्यांच्या पारड्यात टाकू, एक चांगली निवड करू. अव्याहत कामे करणाऱ्या आपल्या संदीप जोशींचा सन्मान करू, असे आवाहनही माजी राज्यमंत्री आमदार डॉ परिणय फुके यांनी केले.

आमदार विनोद अग्रवाल यांचेही समर्थन

गोंदिया विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनीही पदवीधर निवडणुकीसाठी संदीप जोशी यांना पूर्ण समर्थन दिले. समर्थनासह विनोद अग्रवाल यांनी गोंदिया शहरातील विशाल लॉन येथे भव्य सभा घेतली. सभेमध्ये बहुसंख्य पदवीधर, शिक्षक, प्राध्यापक उपस्थित होते.

असे करा मतदान

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे मतदान हे मतपत्रिकेद्वारे (बॅलेट पेपर) होते. यामध्ये मतदारांचे नाव आणि त्यापुढे रकाना असतो. उमेदवाराच्या नावापुढील रकान्यामध्ये मतदारांना पसंतीक्रम द्यायचे असते. हा पसंतीक्रम केवळ अंकातच असावा. उमेदवाराच्या नावापुढे 1 हा अंक काढावा. तो मराठी, इंग्रजी किंवा रोमण लीपीमध्ये लिहिता येते. मात्र रोमण अंकात लिहिल्यास मत वैध होण्याची शक्यता जास्त असते. मतदार नोंदणी केलेल्या सर्व पदवीधरांनी १ डिसेंबर २०२० रोजी भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी यांच्या नावापुढे रोमण लीपीमध्ये I (एक) असा अंक काढून त्यांना बहुमताने विजयी करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

महाराष्ट्रातील कांग्रेस चे एकमेव खासदार बाळु धानोरकर यांचे निधन

चंद्रपूर- आर्णीचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. खासदार धानोरकर त्यांचे …

पार्षद का चुनाव हारने के बाद कांग्रेस प्रत्याशी की हार्ट अटैक से मौत

रीवा के हनुमान नगर पंचायत में पार्षद का चुनाव हारने के बाद कांग्रेस प्रत्याशी की …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved