Breaking News

मनपाचे अधिकारी-कर्मचा-यांनी सायकल चालवून दिला प्रदूषण कमी करण्याचा संदेश

  • राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त पुढाकार
  • आता महिन्यातील एक दिवस सायकलचा

नागपूर, ता.२ : राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाच्या निमित्ताने नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी बुधवारी (ता.२) ला सायकलने मनपा मुख्यालयात पोहचले. त्याचे नेतृत्व मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा, नागपूर स्मार्ट ॲड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कारपोरेशन लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी आणि श्री. संजय निपाणे यांनी केले. इंधनावर चालणारी वाहने टाळून शहरात प्रदूषण कमी करण्यात मनपाने अश्याप्रकारे आपले योगदान दिले.

सर्व अधिकारी व कर्मचारी आप-आपल्या घरुन सायकलने मनपा कार्यालयात पोहचले. श्री. राम जोशी हे हिंगणा टी पाईंट जवळ स्थित आपल्या घरातून आले तर श्री. संजय निपाणे आपल्या सायकलने रामनगर येथून आले. श्री. जलज शर्मा आणि श्रीमती भुवनेश्वरी एस हेसुध्दा आपल्या घरातून आकाशवाणी चौकात सायकलने आले. या मोहिमेत उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) डॉ. प्रदीप दासरवार, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, सहाय्यक आयुक्त श्री. महेश धामेचा, कार्यकारी अभियंता श्री. मनोज गणवीर, परिवहन व्यवस्थापक श्री. शकील नियाजी, राष्ट्रीय नागपूर कारपोरेशन एम्लाी ईज असोसिएशनचे अध्यक्ष श्री सुरेन्द्र टिंगणे, महासचिव श्री. रंजन नलोडे, कोषाध्यक्ष श्री. प्रदीप तंत्रपाळे आदी या मोहिमेत सहभागी झाले होते. टाटा ट्रस्टचे डॉ. टिकेश बिसेन हे बेसा आपल्या घरातुन सायकलने आले.

श्री. जलज शर्मा यांनी सांगितले की, नागपूरात वायु प्रदुषणचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे. राष्रीी य प्रदूषण नियंत्रण दिवसाच्या निमित्ताने सायकलीने मनपा कार्यालयामध्ये येणे याच प्रयत्नाचा एक भाग आहे. कोरोनाच्या काळात नागरिकांमध्ये आपल्या आरोग्याबाबत जागरुकता निर्माण झाली आहे.

श्री. राम जोशी यांनी सांगितले की, हिरवे शहर अशी ओळख असलेल्या नागपूर शहरामध्ये वायू प्रदूषणाचा स्तर कमी करून नागरिकांचे आरोग्य जपले जावे, या हेतूने सायकलला प्रोत्साहित करण्यात येत आहे. सायकलने कार्यालयात आल्यावर प्रदूषण तर कमी होईल तसेच आरोग्यपण उत्तम ठेवता येईल. मनपा अधिकारी व कर्मचारी प्रत्येक महिन्यातून एकदा सायकलने कार्यालयात येऊन नागरिकांना प्रदूषण नियंत्रण करण्याचा संदेश देतील. नागरिकांनीपण यामध्ये पुढाकार घेवून सायकलचा वापर करुन प्रदूषण कमी करण्यात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

श्रीमती भुवनेश्वरी एस. यांनी सांगितले की, नागपूर स्मार्ट सिटीच्या माध्यमाने १८ किमीचा विशेष सायकल ट्रॅक तयार केला जाणार आहे. सी.एस.आर.निधीच्या माध्यमातुन हे काम केल्या जाईल. यासाठी निविदा प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
मनपाचे अधिकारी आणि कर्मचारी आकाशवाणी चौक येथे एकत्रित होऊन तेथून अग्निशमन विभागाकडच्या मार्गाने मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या मुख्य दालनात पोहोचले. झोन स्तरावर देखील अधिकारी व कर्मचारी सायकलने आप-आपल्या कार्यालयात पोहचले.

यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी, पशुचिकित्सा अधिकारी डॉ.गजेंद्र महल्ले, क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे आदी अधिका-यांसह आंतरराष्ट्रीय सायकलपटू डॉ.अमित समर्थ, स्वयंसेवी संस्थांमार्फत ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जायस्वाल, मनपा शाळेच्या विद्यार्थिनी व शालेय राष्ट्रीय सायकलपटू खुशबू पटेल, साक्षी मडावी, पूनम पवार आदींनी मनपाच्या या उपक्रमात सहभाग घेवून व सायकल चालवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

२ आणि ३ डिसेंबर, १९८४ मध्ये भोपाळच्या युनियन कार्बाईडच्या विषारी वायू गळतीमुळे असंख्य नागरिक मृत्यूमुखी पडले. या सर्व नागरिकांच्या स्मृती प्रित्यर्थ ‘राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस’ पाळण्यात येतो. या ‘राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवसा’निमित्त नागपूर महानगरपालिकेद्वारे सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांनी सायकल चालवून पर्यावरण संवर्धनाच्या संदेशासह दुर्घटनेत बळी पडलेल्या सर्व मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा समृद्धी महामार्गावर भिषण अपघात, २५ प्रवाशांचा मृत्यू

नागपूर / बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याला जाणारी बसचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ …

राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर स्वागत 

नागपूर दि.२३ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आगमन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved