Breaking News

दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

चिमूर : – नेरी- चिमूर तालुक्यातील बोथली ते काजळसर रस्त्यावर रामकृष्ण खोब्रागडे यांच्या शेतात पळसाच्या झाडाजवळील वळणावर दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला व त्यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघात झालेल्या व्यक्तीचे नाव गोकुल शिवराम चौधरी रा.पेंढरी (को), ( वय ४५ वर्षे, ) असे आहे.

गोकुल चौधरी हा बोथली येथे नातेवाईकांच्या येथे तेरवीनिमित्त आला होता. तेरवीचा कार्यक्रम आटोपून सायंकाळच्या सुमारास आपल्या गावाकडे हिरो होंडा स्लेंडर प्लस दुचाकीने क्रमांक – एम.एच.- ३१- बी.ओ.- ६९३२ निघाले असता अडेगाव फाट्या समोर रामकृष्ण खोब्रागडे यांच्या शेताजवळील असलेल्या वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने सरळ पळसाचे झाड व रस्त्यावरील दगडाला धडक मारुन रस्त्याचे बाजूला पडला असता या दुर्दैवी अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
सदर घटना ही रात्रीच्या वेळेची असल्याने आणि रस्त्यावर भुतगांज्या वनस्पती असल्याने ही बाब रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्याच्या निदर्शनास आली नाही त्यामुळे मदत मिळु शकली नाही . ३० नोव्हेंबरला उघडकीस आली.

घटनास्थळी मेजर विलास निमगडे, पो.का.रोशन तामशेटवार, अंमलदार सचिन खामनकर, सैनिक सचीन गायकवाड, शेख ड्रायव्हर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मृतकाच्या मागे पत्नी व बराच मोठा आप्त परिवार आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

*स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

जीर्ण इमारतीत विद्यार्थ्याचे ज्ञानार्जन माजी सभापती च्या पत्राला केराची टोपली

शंकरपूर- चिमूर तालुक्यात चिचाळाशास्त्री येथे जीर्ण व पडक्या इमारतीत विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू असून विद्यार्थ्याचे जीव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved