Breaking News

नागपुर च्या जनतेकरीता महत्वाची बातमी

पालकमंत्री मा. डॉ. नितीन राऊत यांनी नागपूर जिल्ह्यात व शहरात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्यामुळे त्यावर उपाययोजना लागू करण्यासाठी कठोर निर्णय आज जाहीर केले

• मा. मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेली “मी जबाबदार” मोहीम शहरात व जिल्ह्यात प्रभावीपणे राबविणार.

• कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस दिनांक 7 मार्चपर्यंत बंद ठेवणार.

• जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा शनिवार व रविवार (अत्यावश्यक सेवा -वृत्तपत्र, दूध भाजीपाला, फळे, औषध पेट्रोल पंप वगळून) बंद ठेवणार.

• आठवडी बाजारामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी आठवडी बाजार दिनांक 7 मार्चपर्यंत बंद ठेवणार.

• जिल्ह्यातील हॉटेल (रेस्टॉरंटस्) 50 टक्के क्षमतेने रात्री 9 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी.

• लग्न, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रम दिनांक 7 मार्चपर्यंत बंद. परंतु मंगलकार्यालय/ लॉन्स/रिसॉर्ट दिनांक 25 फेब्रुवारीपासून 7 मार्चपर्यंत बंद राहतील.

• कोविड सेंटर पुन्हा सुरु करणार.

• कोरोना प्रतिबंधासाठी गृहभेटीची संख्या वाढवून फ्ल्यू, आएलटी तसेच सारीची तपासणी करणार.

• शहरातील तसेच जिल्ह्यातील नवीन हॉटस्पॉट झोन येथे इमारत, लेन, मोहल्लानिहाय मायक्रोकन्टोन्मेंट झोन तयार करुन सक्तीने उपाययोजना. हॉटस्पॉट भागावर अधिक लक्ष केंद्रित.

• मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई.

• नियम पाळून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.

• जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी .

• शासकीय आणि खासगी प्रयोगशाळेमध्ये पूर्ण क्षमतेचा वापर करुन नमुना तपासणी.
• त्रिसूत्रीचे पालन अनिवार्य.

• कोविडसंदर्भात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा दररोज विभागीय आयुक्त आढावा घेणार.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पारडी येथील प्रस्तावित बाजारपेठेची मनपा आयुक्तांनी केली पाहणी

नागपूर – नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (२७ जून) पारडी …

मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 25 जून ते २४ जुलै या कालावधीत

बीएलओ करणार 25 जून ते २४ जुलै या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदार यादीची तपासणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved