
प्रतिनिधी नागपूर
नागपूर दि. 07 : इंग्रज सत्तेविरुद्ध सशस्त्र लढा देणारे, देशवासीयांना स्वातंत्र्याचे स्वप्न दाखवून ते पूर्ण करण्याचा विश्वास, बळ देणारे आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांना आज त्यांच्या जयंतीनिमीत्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विमला आर. यांनी अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जगदीश कातकर, उपजिल्हाधिकारी मिनल कळसकर, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे, तहसिलदार सुधाकर इंगळे, राहूल सारंग, सिमा गजभिये, मृदुला मोरे आदी अधिकारी-कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.