Breaking News

थोरांचा वारसा जपणे काळाची गरज-प्राजक्ता लवंगारे-वर्मा

राजे उमाजी नाईक जयंती उत्साहात

प्रतिनिधी नागपूर

नागपूर, दि. 7 : महाराष्ट्र ही थोर संतांची भूमी आहे. अशा थोरांचा वारसा जतन करणे आज गरजेचे आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे- वर्मा यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
राजे उमाजी नाईक यांच्यासारख्या राष्ट्रभक्तांच्या विचाराचा वारसा आपण जपला पाहिजे. आज नवीन पिढीला त्याचा विसर पडत चालला आहे. म्हणून महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेचे जतन करण्यासाठी तसेच त्यांच्या विचाराची नवीन पिढीला जाण व्हावी, यासाठी असे उपक्रम साजरे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. अतिरिक्त आयुक्त संजय ढिवरे यांनी अभिवादन केले. श्री. ढिवरे यांनीही राजे उमाजी नाईक यांच्या जीवन चरित्र्यावर प्रकाश टाकला. सहाय्यक आयुक्त शैलेंद्र मेश्राम, विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. निवासी उपजिल्हाधिकारी जगदीश कातकर, उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, अनिल सवई, नागपूरचे उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे, तहसीलदार सुधाकर इंगळे, राहुल सारंग, सीमा गजभिये, मृदूला मोरे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

कोविडमुळे पती गमावलेल्या महिला व अनाथ मुलांनी विशेष सहाय्य योजनेचा लाभ घ्यावा -जिल्हाधिकारी

“असहाय्य नागरिकांना लाभ मिळवण्यासाठी मदत करण्याचे आवाहन” नागपूर दि. 17 :- कोरोनामुळे वैधव्य आलेल्या महिला …

बलात्कार पिडीत युवतीने गळफास घेऊन केली आत्महत्या

प्रतिनिधी / नागपूर नागपूर : – एका १७ वर्षीय बलात्कार पीडित युवतीने नागपुरमध्ये गळफास घेऊन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved