Breaking News

दवलामेटी येथे विविध ठिकाणी तान्हा पोळा केला साजरा

वंचित बहुजन आघाडी चा पदाधिकाऱ्यांनी पुरस्कार व भेटवस्तू केले वितरित

दवलामेटी(प्र): दवलामेटी परिसरात दिवस भर पावसाचा सरी लागुन असताना, सायंकाळी पावसाने धोडी विश्रांती घेताच दवलामेटी परिसरात विविध ठिकाणी सामाजिक व राजकीय संघटने कडून आयोजित तान्हा पोळा मध्ये बालक आपल्या नंदी सोबत आपल्या पालकांना घेऊन आवडीने सहभागी झाले!
हिल टॉप कॉलनी स्थित तिजारे ले आऊट येथे वंचित बहुजन आघाडी चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तान्हा पोळा आयोजित केला . परिसरातील सौ. धांदे व ईतर महिलांनी लाकडा पासून तयार केलेले सजविलेले नंदी बैला ची पूजा केली . नंतर प्रमुख निरक्षक नीलकंठ बनसोड , राजाराम गवई व देवमन हूमने यांनी नंदी चा सजावटीचे निरीक्षण केले.

बालक आयु रीधम बोरकर , सार्थक देशपांडे, अन्नू नुत्तीवार यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते प्रभाकर कांबळे, सौ. धांदे व पत्रकर नागेश बोरकर यांचा हस्ते प्रदान करण्यात आले. अन्य ३० बालकांना प्रोत्साहन स्वरुपात रोखं व मिठाई देण्यात आले .

 

वंचित बहुजन आघाडी चे दवलामेटी सांघटक रोहित राऊत , आयोजक मंगला कांबळे, सत्यजित धांदे यानी सर्व सहभागी बालकांना चॉकलेट, मिठाई वितरित केली . व कार्यकर्त्यांनी उपस्थित बालकांना व पालकांना तान्हा पोळा निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शासकीय मालमत्तेवर लेआउट टाकून फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा

– सुनील केदार  तरोडी (खु) भूखंड धारकांसमक्ष अधिकाऱ्यांसोबत बैठक  क्रीडा संकुलासाठी अन्यायग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी …

उपमहापौर ने अपने घर में गणपति को किया विराजमान

नागपुर :- उपमहापौर सौ मनिषा धावड़े इनके घर आनेवाले गणपति उत्सव को मनाने के लिए …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved