Breaking News

पीओपी मूर्तीसंदर्भात शहरात धडक कारवाई ९० मूर्ती जप्त ; एक लाख २१ हजार रुपये दंड वसूल

नागपूर, ता. ७ : बंदी असलेल्या पीओपी मूर्तींच्या विक्रीसंदर्भात नागपूर महानगरपालिकेद्वारे संपूर्ण शहरात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या निर्देशानुसार व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी जारी केलेल्या आदेशानुसार सुरू असलेल्या कारवाई अंतर्गत मंगळवारी (ता.७) दहा पैकी पाच झोनमध्ये कारवाई करण्यात आली. याअंतर्गत शहरातील ९० पीओपी मूर्ती जप्त करण्यात आल्या व मूर्ती विक्रेत्यांकडून एक लाख २१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. याशिवाय पीओपी गणेश मूर्तींची विक्री करणारी दोन दुकाने हटविण्यात आली.

पीओपी मूर्तीसंदर्भात सुरू असलेल्या कारवाईमध्ये उपद्रव शोध पथकाद्वारे मंगळवारी (ता.७) शहरातील लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, नेहरूनगर आणि मंगळवारी या पाच झोनमधील १०६ दुकानांची तपासणी करण्यात आली त्यातील ९० पीओपी मूर्ती जप्त करण्यात आल्या. सर्वाधिक ५० हजार रुपये दंड हनुमाननगर झोन अंतर्गत वसूल करण्यात आला. झोनमधील २५ दुकानांची तपासणी करून ६० पीओपी मूर्ती जप्त करण्यात आल्या. धरमपेठ झोनमध्ये ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या पदाधिका-यांनी मनपाच्या पथकाला पीओपी मूर्तींची ओळख पटवून देण्यात मदत केली. संस्थेच्या सहकार्याने झोनमधील १५ दुकानांची तपासणी करून २७ मूर्ती जप्त करण्यात आल्या. दोन दुकानांना तात्काळ हटविण्यात आले. संपूर्ण कारवाईत झोनपथकाने ३० हजार रुपये दंड वसूल केला. या कार्यामध्ये ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, श्रीया जोगे यांनी सहकार्य केले.

मंगळवारी झोनमधील १५ दुकानांची तपासणी करून ३ मूर्ती जप्त करण्यात आल्या व १७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आले. नेहरूनगर झोनमधील ३६ दुकानांची कारवाई करीत १४ हजार रुपये दंड तर लक्ष्मीनगर झोनमधील १५ दुकानांची तपासणी करून १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आले. या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले व उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांनी केले. झोन पथकाने कारवाईमध्ये जप्त केलेल्या पीओपी गणेश मूर्ती संबंधित झोनच्या आरोग्य अधिका-यांकडे सुपूर्द केल्या.

याशिवाय नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.७) एका दुकान/प्रतिष्ठानावर कारवाई करुन ५००० रुपयांचा दंड वसूल केला. पथकाने ५० प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा समृद्धी महामार्गावर भिषण अपघात, २५ प्रवाशांचा मृत्यू

नागपूर / बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याला जाणारी बसचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ …

राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर स्वागत 

नागपूर दि.२३ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आगमन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved