Breaking News

विधान परिषद निवडणुकीत एक अर्ज दाखल उद्या अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

नागपूर, दि. 22 : नागपूर जिल्ह्यामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा प्रक्रियेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या सातव्या दिवशीही एक अर्ज दाखल झाला आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज अर्ज दाखल केला. आतापर्यंत इच्छूकांनी 40 अर्जाची उचल केली आहे.

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षीक निवडणूक-2021 अंतर्गत स्थानिक प्राधिकारी मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम 9 नोव्हेंबर रोजी जाहिर केला आहे. 16 नोव्हेंबरला या निवडणुकीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नामनिर्देशनची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर असून 24 नोव्हेंबरला दाखल अर्जाची छाननी होईल. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर आहे. तर मतदानाचा दिवस 10 डिसेंबर असा आहे. मतमोजणी 14 डिसेंबरला होणार आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील वीज ग्राहकांना महावितरण चा झटका

महावितरण मुंबई च्या भरारी पथकाची धडक कारवाई अनेकांची वीजचोरी पकडली मुंबईच्या भरारी पथकाने पकडले अनेक …

तिन महिन्यातच रस्ता उखरला- निकृष्ट दर्जाचे काम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेला मौजा कोलारा तु हे पर्यटण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved