
नागपूर, दि.22 :- जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतीमध्ये रिक्त असलेल्या 116 सदस्य पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून निवडणूक 21 डिसेंबर रोजी होणार आहे.
निवडणुकीत नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गातील रिक्त जागा भरण्यापूर्वी त्या ग्रामपंचायतीचे आरक्षण 50 टक्के मर्यादेत ठेवावे आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाचे आरक्षण 27 पर्यंत ठेवावे याबाबत सूचना प्राप्त झाल्या असून त्यानुसार नागरिेकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण म्हणून अधिसूचित करण्यात आलेली आहे.
निवडणूक कार्यक्रम आदेशातील निर्देशानुसार सदर निवडणूक सर्वोच्च न्यायालयातील रिट याचिका 980/2019 मध्ये 4 मार्चचे आदेश उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे रिट याचिका 8826/2021, 16 ऑगस्ट रोजी दिलेले आदेश तसेच मुंबई उच्च न्यायलय औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या रिट याचिका 11744/2021 च्या अंतिम निकालाच्या अधीन राहून घेण्यात येत आहेत, असे उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी (ग्रापनि) यांनी कळविले आहे.