Breaking News

आयटीआय उत्तीर्ण शिकाऊ उमेदवारांकरीता शासकीय औद्योगिक

प्रशिक्षण संस्थेत भरती मेळाव्याचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर दि. 18 डिसेंबर: चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील आय.टी.आय उत्तीर्ण उमेदवारांकरीता दोन दिवसीय रोजगार व शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,चंद्रपुर येथे दि.21 व 22 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले आहे. या भरती मेळाव्यामध्ये नामांकित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित असणार आहे.

फिटर, डिझेल मेकॅनिक, मोटर मेकॅनिक,टर्नर, मशिनिस्ट, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, टूल अँड डाय मेकर, प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, ट्रॅक्टर मेकॅनिक, सिओई ऑटोमोबाईल, पेंटर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, कार्पेंटर, शीट मेटल वर्कर आदी ट्रेड व्यवसायातील उमेदवारांसाठी नामांकित कंपन्यांमध्ये रोजगार तथा शिकाऊ उमेदवारीसाठी जागा उपलब्ध आहेत.

या भरती मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, संबंधित ट्रेड प्रमाणपत्र तथा शालेय प्रमाणपत्रासह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कौशल्यम सभागृहात दि.21 व 22 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता उपस्थित रहावे. असे आवाहन सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार श्रीमती प्र.ही. दहाटे यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

श्रीमती विद्या गाडेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या ओ. बी. सी. सेलच्या प्रदेश सचिव पदावर निवड सौ. सुनंदा राजेंद्र पवार यांच्या हस्ते बारामती येथे नियुक्तीपत्र प्रदान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव  9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर …

त्या दोन लीडरला गुंतवणूकदारांनी दिला चौप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या वादात असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved